वेतनासाठी गावस्कर सुप्रीम कोर्टात
By Admin | Updated: July 11, 2014 15:52 IST2014-07-11T14:58:11+5:302014-07-11T15:52:38+5:30
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी वेतनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

वेतनासाठी गावस्कर सुप्रीम कोर्टात
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११ - बीसीसीआयचे (बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोलचे ) हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी वेतनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बीसीसीआयकडून आपल्याला वेतन मिळावे अशी मागणी गावस्कर यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २८ मे रोजी गावस्कर यांची बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचे अडकल्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून हटवम्यात आले होते व त्यांच्याऐवजी गावस्कर यांची निवड करण्यात आली होती. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे सातवे पर्व दुबई व भारतात यशस्वीरित्या पार पडले.
दरम्यान, सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षेतेखाली आयपीएल स्पॉटफिकसिंग प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समिती याप्रकरणी १३ महत्वाच्या व्यक्तींची चौकशी करत आहे.