शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मला ब्लॉक कराल; 130 कोटी जनतेचे काय करणार? गौतम गंभीरचं मेहबुबा मुफ्तींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:49 IST

क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून राजकारणाच्या मैदानात सक्रीय झालेला गौतम गंभीर सध्या त्याचा आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

नवी दिल्ली -  क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून राजकारणाच्या मैदानात सक्रीय झालेला गौतम गंभीर सध्या त्याचा आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, गौतम गंभीर आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यात सध्या काश्मीर प्रश्नावरून खडाखडी सुरू आहे. बुधवारी ट्विटरवर रंगलेल्या जुगलबंदीनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ब्लॉक केले होते. आता गंभीरने त्याला प्रत्युत्त दिले असून, मला ब्लॉक कराल, पण देशातील 130 कोटी जनतेला कधीपर्यंत ब्लॉक कराल? अशी विचारणा गंभीरने केली आहे. ट्विरवर रंगलेल्या वादानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ब्लॉक केले होते. दरम्यान, या प्रकारावरून गौतम गंभीरने मेहबूबा यांना प्रत्युत्तर दिले आहे. गंभीर म्हणाला, मेहबूबा मुफ्ती मला ब्लॉक करू शकतात. पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील  जनतेला कधीपर्यंत ब्लॉक करून ठेवतील, कधीपर्यंत सीमेपलीकडच्या बाबींची चर्चा करणार. या देशात एक लाट आहे आणि मेहबूबा प्रवाहासोबत राहिल्या नाहीत. तर बुडून जातील.'' असा इशारा गंभीरने दिला. 

 यावेळी गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. ''2014 मध्ये लाट होती आता 2019 मध्ये त्सुनामी येणार आहे. असा दावा त्याने केला.   गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटरवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली होती. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली. यानंतर गंभीर आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले होते.  भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात 370 कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर मुफ्ती यांनी टीका केली. त्या म्हणाल्या,''जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधान लागू होणार नाही आणि भारतीयांना हे समजत नसेल तर देशच नष्ट होईल.'' त्याला प्रत्युत्तर देताना हा भारत आहे आणि तुमच्या सारखा डाग नाही, जो सहज गायब होईल, असा टोला गंभीरने लगावला होता. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत