शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 7:06 AM

कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; झारखंडमधून मुख्य आरोपीला बेड्या

धनबाद: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक करण्यात आली आहे. झारखंडच्या धनबादमधून ऋषिकेशला कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं अटक केली. पोलिसांना ऋषिकेशच्या घरात सनातन धर्माशी संबंधित काही पुस्तकं आढळून आली आहेत. ऋषिकेश गेल्या सहा महिन्यांपासून धनबादमधल्या कतरासमधील एका पेट्रोल पंपवर ओळख बदलून राहत होता. ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांचं विशेष तपास पथक गुरुवारी कतरासला पोहोचलं. त्यांनी कतरासमधल्या भगत परिसरात छापे टाकले. या कारवाईदरम्यान राजेश उर्फ ऋषिकेश देवडीकरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांना सनातन धर्माशी संबंधित अनेक पुस्तकं सापडली. ऋषिकेश गेल्या सहा महिन्यांपासून खेमका पेट्रोल पंपवर काम करत होता. याच पेट्रोल पंपच्या मालकाच्या घरात तो भाड्यानं राहत होता. चार जणांच्या हत्या प्रकरणात पोलीस ऋषिकेशला शोधत होते, अशी माहिती विशेष तपास पथकाचे नेतृत्त्व करणारे निरीक्षक पुनीत यांनी दिली. 'गेल्या दीड वर्षांपासून ऋषिकेशचा शोध सुरू होता. पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:ला वाचवण्यासाठी तो झारखंडला पळून गेला होता,' असं पुनीत यांनी सांगितलं. सामाजिक संस्थेशी संबंधित चार जणांच्या हत्या प्रकरणातदेखील ऋषिकेशचा सहभाग आहे. या प्रकरणात १२ पेक्षा अधिक जणांना आधीच अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. ऋषिकेश मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो वारंवार स्वत:चं नाव बदलायचा. ऋषिकेश गेल्या सहा महिन्यांपासून प्रदीप खेमका यांच्या पेट्रोल पंपवर नोकरी करत होता. आपण बेरोजगार आणि साधक असल्याचं त्यानं नोकरी मागताना सांगितलं होतं, अशी माहिती खेमका यांनी पोलिसांना दिली. पेट्रोल पंपवर नोकरी करताना त्यानं स्वत:बद्दल कोणालाही फारशी माहिती दिली नाही. त्यामुळे कोणालाही त्याच्याबद्दल संशय वाटला नाही. खेमका यांनी या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन पोलिसांना दिलं आहे. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशSanatan Sansthaसनातन संस्था