शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

गुजरातमध्ये काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबविण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 09:21 IST

गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

ठळक मुद्देगुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे.गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.

अहमदाबाद, दि. 29- गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. पक्षातील या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसने शुक्रवारी भाजपवर पैसा आणि सत्तेच्या बळावर काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सध्या पक्षात असलेल्या आमदारांनाही तंबी दिली. जर पक्ष सोडून गेलात तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशा शब्दात काँग्रेसने आमदारांना खडसावलं. शुक्रवारी बालासिनोर मतदारसंघाचे आमदार मानसिंह चौहान यांनी राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष रमणलाल व्होरा यांना सकाळी दिला. वन्सदा येथील आमदार छन्नाभाई चौधरी यांनी अध्यक्षांकडे त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री राजीनामा सुपुर्द केला. तर काँग्रेसचे आमदार राघव पटेल यांनी लवकरच इतर पाच आमदारांसह राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. प्रतिष्ठेचा मुद्दा8 ऑगस्ट रोजी होणारी निवडणूक हा काँग्रेससमोरील सगळ्यात मोठ्या चिंतेचा विषय आहे. ८ ऑगस्ट रोजी राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होते आहे. यामध्ये एक जागा काँग्रेसकडे आहे तर इतर दोन जागा भाजपकडे आहेत. भाजपकडून पैशांचा वापर करून तिसरी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. भाजपकडून त्या तिसऱ्या जागेसाठी बलवंत सिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने राज्यसभेसाठी अहमद पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील नव्या समीकरणानुसार अहमद पटेल यांची जागा फसेल अशी चिन्ह दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडे सध्या 57 आमदार आहेत. त्यापैकी 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आमदारांची संख्या आता 51 झाली आहे. काँग्रेसला राज्यसभेतील जागा जिंकण्यासाठी एकुण 47 आमदारांची गरज आहे. पण पक्षामध्ये सुरू झालेल्या आमदारांच्या गळतीमुळे काँग्रेसच्या पारड्यातील आमदारांची संख्या कमी होत असून जागा जिंकण कठीण होत असल्याचं बोललं जातं आहे. अहमद पटेल यांची जागा जिंकणं हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. काँग्रेस पक्षातील सगळे महत्त्वाचे निर्णय हे अहमद पटेल यांच्याच सल्ल्याने घेतले गेल्याचं बोललं जातं.त्यामुळे अहमद पटेल यांना राज्यसभेतील जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.  गळती थांबविण्याचा प्रयत्न गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.