पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताला गॅसच्या झळा सोसाव्या लागत आहे. देशात गॅस टंचाई जाणवत असून, याचा थेट फटका व्यावसायिकांना बसू लागला आहे. आखातातून होणार गॅस पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार, याची प्रतिक्षा असताना काही दिलासा देणारी घटना गुरुवारी घडली. एलपीजी घेऊन निघालेले जहाज होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारतात पोहोचले आहे.
अपोलो ओशन असेल गॅस घेऊन आलेल्या जहाजाचे नाव आहे. ते आता न्यू मंगळुरू पोर्टवर पोहोचले आहेत.
जहाजात 17,600 मेट्रिक टन एलपीजी
मिळालेल्या माहितीनुसार, अपोलो ओशन जहाज १७,६०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन आले आहे. हा एलपीजी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांना वितरित केला जाणार आहे.
आणखी एलपीजी जहाजे भारताच्या दिशेने
अपोलो ओशन दाखल झाले आहे. त्याचबरोबर आणखी काही जहाजे भारताच्या दिशेने येत आहेत. वसंत नावाचे एलपीजी घेऊन येणारे जहाज गुरुवारी (२६ मार्च) रात्रीपर्यंत भारतात पोहोचण्याचा अंदाज आहे. हे जहाज गुजरातमधील वाडीनार पोर्टवर येणार आहे. या जहाजात ४७,६०० मेट्रिक टन एलपीजी आहे.
होर्मुझ मार्गे आणखी एक जहाज येत आहे. पीएनजी गॅस असलेले हे जहाज शुक्रवारी पहाटे न्यू मंगळुरू पोर्टवर पोहचणार असल्याचा अंदाज असून, त्यात ४५ हजार मेट्रिक टन गॅस असल्याचे सांगण्यात आले.
Web Summary : Amid West Asia tensions, an LPG tanker safely reached India via the Hormuz Strait, bringing some relief to gas shortages. More LPG ships are en route to various Indian ports, promising further supply boosts for IOCL and BPCL.
Web Summary : पश्चिम एशिया तनाव के बीच, एक एलपीजी टैंकर सुरक्षित रूप से होर्मुज जलडमरूमध्य के माध्यम से भारत पहुंचा, जिससे गैस की कमी से कुछ राहत मिली। अधिक एलपीजी जहाज विभिन्न भारतीय बंदरगाहों के लिए रवाना हो रहे हैं, जिससे आईओसीएल और बीपीसीएल के लिए आपूर्ति बढ़ने की उम्मीद है।