मोबाइलसारखीच लवकरच बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:24 IST2025-09-29T05:24:13+5:302025-09-29T05:24:34+5:30
तुम्ही तुमच्या एलपीजी पुरवठादारामुळे नाराज आहात का? असे असल्यास आता लवकरच तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो.

मोबाइलसारखीच लवकरच बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या एलपीजी पुरवठादारामुळे नाराज आहात का? असे असल्यास आता लवकरच तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. जशी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी आहे, तशीच आता एलपीजी पोर्टेबिलिटीची सोयही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच सध्याचे गॅस कनेक्शन बदलण्याची गरज न पडता ग्राहकांना आपला पुरवठादार बदलता येईल. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगले पर्याय आणि उत्तम दर्जाची सेवा मिळणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) 'एलपीजी इंटरऑपरेबिलिटी' या मसुद्यावर ग्राहक, वितरक आणि संबंधित हितधारकांकडून अभिप्राय मागवला आहे.
नेमका काय त्रास होतो?
सध्या : अनेक वेळा स्थानिक वितरकांकडून वेळेवर सिलिंडर मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात. यापूर्वी ग्राहकांना फक्त डीलर बदलण्याचा पर्याय होता, तेल कंपनी बदलण्याचा नव्हता. अशा वेळी त्यांना त्रास सहन करावा लागत होता.
लवकरच : ग्राहकांना एलपीजी कंपनी किंवा डीलर निवडण्याची मोकळीक.