'लसूण ४०० रुपये किलो, टोमॅटो...'; राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:38 IST2024-12-24T11:34:29+5:302024-12-24T11:38:14+5:30

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज भाजी मंडईतून फेरफटका मारला. त्यांनी भाज्याचे दर जाणून घेतले.

Garlic Rs 400 per kg, tomatoes Rahul Gandhi directly reached the vegetable market, found out the prices of vegetables | 'लसूण ४०० रुपये किलो, टोमॅटो...'; राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

'लसूण ४०० रुपये किलो, टोमॅटो...'; राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज थेट भाजी मंडईमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी दुकानदारांकडून लसून, टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दर जाणून घेतले. दुकानदारांनी त्यांना लसूनचा दर ४०० किलो सांगितला. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाजी मंडई भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, लसूणची किंमत पूर्वी ४० रुपये होती आणि आता ४०० रुपये झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले असून सरकार कुंभकरणासारखे झोपले आहे. 

लाडक्या बहीणींसाठी खुशखबर! डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर , आजपासून खात्यात पैसे जमा होणार

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, गिरी नगर समोर हनुमान मंदिरच्या भाजी मंडईमधील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये महिला राहुल गांधी यांना चहा पिण्यासाठी बोलावले आहे. जेणेकरून, ते येऊन महागाई किती आहे ते पाहतील. महागाईमुळे आमचे बजेट खूप खराब होत आहे. कोणाचाही पगार वाढला नसून दर वाढले असून ते कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे राहुल गांधींना भेटणाऱ्या महिला सांगत आहेत.

या व्हिडीओमध्ये राहुल गांधी महिलांना काय खरेदी केले असे विचारत आहेत. यावर महिला कांदा, टोमॅटो खरेदी केल्याचे सांगत आहे. एक महिला भाजीवाल्या दुकानदाराला विचारते की, भाज्यांचे एवढे का महागले आहेत? कशाचेही दर कमी झालेले नाहीत. काहीही घेतले तरी ३०-३५ रुपयांचे नाही, सगळेच ४०-५० रुपयां पेक्षा जास्त दराने आहे.

या व्हिडिओमध्ये भाजी विक्रेते यावेळी खूप महागाई असल्याचे सांगत आहेत. एवढी महागाई यापूर्वी कधीच नव्हती. राहुल गांधी भाजी विक्रेत्याला विचारतात लसूण किती रुपये किलो आहे? यावर भाजी विक्रेते सांगतात की, लसणाचा भाव ४०० रुपये किलो आहे.

राहुल गांधी एका महिलेला विचारतात की, तुम्हाला महागाई का वाढत आहे, असे वाटते. यावर या महिलेचे म्हणणे आहे की, सरकार याकडे लक्ष देत नाही, त्यांना फक्त त्यांच्या भाषणाची काळजी आहे. सामान्य माणूस काय खाणार याची सरकारला काळजी नाही. ज्या वस्तूची किंमत पूर्वी ५०० रुपये होती ती आज १००० रुपये आहे. आता खर्च कमी करायचा असेल तर कपात करावी लागेल. 

Web Title: Garlic Rs 400 per kg, tomatoes Rahul Gandhi directly reached the vegetable market, found out the prices of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.