पराभूत महिला उमेदवाराला सहानुभूती म्हणून मतदारांनी घातल्या नोटांच्या माळा, जमले एवढे पैसे की मोजून संपेनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:57 PM2021-10-01T15:57:44+5:302021-10-01T15:59:02+5:30

Rajasthan News: पराभवानंतर सदर महिला उमेदवाराबाबत ग्रामस्थांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली. ग्रामस्थांनी सहानुभूती म्हणून या महिला उमेदवारासाठी ७० लाख रुपयांचा मदतनिधी उभा केला.

The garland of notes put up by the voters as sympathy for the defeated female candidate | पराभूत महिला उमेदवाराला सहानुभूती म्हणून मतदारांनी घातल्या नोटांच्या माळा, जमले एवढे पैसे की मोजून संपेनात 

पराभूत महिला उमेदवाराला सहानुभूती म्हणून मतदारांनी घातल्या नोटांच्या माळा, जमले एवढे पैसे की मोजून संपेनात 

Next

जयपूर - राजस्थानमध्ये नुकत्याच आटोपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक अजब प्रकार पाहायला मिळाला. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची एक महिला उमेदवार प्रधान पदाची निवडणूक हरली. तिला काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या पराभवानंतर सदर महिला उमेदवाराबाबत ग्रामस्थांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली. ग्रामस्थांनी सहानुभूती म्हणून या महिला उमेदवारासाठी ७० लाख रुपयांचा मदतनिधी उभा केला. (The garland of notes put up by the voters as sympathy for the defeated female candidate)

निवडणुकीत पराभूत झालेल्या ब्रह्मकुमारी पारासरिया यांचे पती रामप्रसाद ऊर्फ बबलू यांच्यासाठी लोकांनी ७० लाख रुपये भेट म्हणून दिले. निवडणुकीत झालेल्या खर्चाची काही प्रमाणात भरपाई व्हावी, यासाठी लोकांनी ही आर्थिक सहानुभूती दिली. धन्यवाद सभेमध्ये झालेल्या या क्राऊड फंडिंगवेळी राष्ट्री लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक हनुमान बेनिवाल हेसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मतदारांनी जनसहभागातून मदतीचे हे उदाहरण प्रस्तूत केले. 

प्रधान पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या महिला उमेदवाराने जनतेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी धन्यवाद सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी क्राऊड फंडिंग म्हणून पराभूत महिला उमेदवाराच्या पतीच्या गळ्यात नोटांच्या माळा घालण्यास सुरुवात केली. मारवाडमध्ये असे पहिल्यांदा घडलेले नाही. सरपंचाच्या निवडणुकीवेळीही अनेक ठिकाणी पराभूत झालेल्या उमेदवाराला लोकांनी नोटांच्या माळा घालून त्याचा संपूर्ण खर्च उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. पराभूत उमेदवारांना ५०-५० लाखांपर्यंतचे सहकार्य मिळालेले आहे.

त्याचे झाले असे की, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या उमेदवारा ब्रह्मकुमारी यांनी प्रधान पदाची निवडणूक लढवली होती. त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. आधी पंचायत निवडणूक आणि नंतर प्रधानपदाची निवडणूक यामध्ये खूप पैसे खर्च झाले. ब्रह्मकुमारी यांच्या कुटुंबाचे या भागात राजकीय वर्चस्व आहे. त्यांचे सासरे स्वरूप राम पारासरिया अनेकदा सरपंच राहिले आहेत. 

Web Title: The garland of notes put up by the voters as sympathy for the defeated female candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.