शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर सचिन बिश्नोईला घेतले ताब्यात; अझरबैजानमधून भारतात आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:13 IST

पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी असलेल्या बिश्नोईला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. या हत्येप्रकरणी कथितरित्या सहभागी असलेला गँगस्टर सचिन बिश्नोई याला अझरबैजानमधून भारतात आणण्यात आले आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या प्रकरणातील कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे अधिकारी अझरबैजानची राजधानी बाकू येथे गेले होते.

मातेनेच नाळेने आवळला नवजात शिशुचा गळा; आशा वर्कर्सची तपासात बहुमोल मदत

मिळालेली माहिती अशी, बिश्नोई उर्फ ​​सचिन थापनचे बाकू येथून यशस्वीपणे प्रत्यार्पण करण्यात आले. पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी असलेल्या बिश्नोईला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

सचिनने भारतात राहून मुसेवाला हत्याकांडाची नियोजन केले.  सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या काही दिवस आधी बिश्नोई बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून गेला होता. काही दिवसापूर्वी एनआयएने  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी विक्रमजीत सिंग उर्फ ​​विक्रम ब्रार याला अटक केली. विक्रम ब्रारला प्रत्यार्पणाअंतर्गत यूएईमधून भारतात आणण्यात आले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. एनआयएने सांगितले की, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यासह इतर आणि व्यावसायिकांच्या हत्येमध्ये ब्रारचा हात होता.

याशिवाय, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला गुजरातच्या तुरुंगातून दिल्लीत आणून राष्ट्रीय राजधानीतील मंडोली तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याने मुसेवाला याच्या हत्येतील आपला सहभाग नाकारला आहे.

मुसेवाला याची मे २०२२ मध्ये हत्या झाली होती. सिद्धू  मुसेवाला म्हणून ओळखले जाणारे शुभदीप सिंग सिद्धू यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गायकाला पॉईंट ब्लँक रेंजवर गोळी मारण्यात आली आणि मानसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. हल्लेखोरांनी मूसवाला यांच्यावर ३० हून अधिक राऊंड गोळीबार केला.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPoliceपोलिस