शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

सलमानला ठार मारण्याची धमकी देणारा 'हा' गँगस्टरही त्याच कारागृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 9:20 AM

जोधपूर न्यायालयाच्या आवारातच दिली होती जीवे मारण्याची धमकी

काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. याच तुरुंगात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईलादेखील ठेवण्यात आले आहे. लॉरेन्सने काही दिवसांपूर्वीच जोधपूर न्यायालयाच्या आवारात सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कारागृहात सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात लॉरेन्सने सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. काळवीट शिकार प्रकरणातच त्याने ही धमकी दिली होती. जोधपूर न्यायालयाच्या आवारातच हा संपूर्ण प्रकार घडला होता. लॉरेन्स बिष्णोईच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खून, खंडणी, अवैध शस्त्रांचा वापर अशा अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरोधात आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यात लॉरेन्सविरोधात गुन्हे दाखल आहेत. जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात आसारामदेखील शिक्षा भोगत आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम सध्या जेलची हवा खातो आहे. आसारामने अनेकदा जामिनासाठी प्रयत्न केले आहेत. प्रकृतीचे कारण देत आसारामने तुरुंगाबाहेर पडण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र त्यात तो अपयशी ठरला आहे.   

टॅग्स :Salman Khanसलमान खानBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणJodhpur courtजोधपूर न्यायालय