शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या भूमिकेमुळे गंगाजमुना संतप्त

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

धावपळ : भिंत पडल्यामुळे महिला गंभीर जखमी

धावपळ : भिंत पडल्यामुळे महिला गंभीर जखमी
नागपूर : बहुचर्चित गंगाजमुनातील वस्तीत आज पोलिसांच्या कारवाईमुळे धावपळ उडाली. अशात बांधकाम सुरू असलेल्या भिंतीचा मलबा अंगावर पडल्यामुळे एक महिला गंभीर जखमी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
गंगाजमुना वस्तीत परगावहून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलींना डांबून ठेवले जाते. त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरप्रकाराला पोलिसांचीही अप्रत्यक्ष साथ आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक मुलींची या नरकातून सुटका केली आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन आठवड्यांपुर्वी पोलिसांनी या वस्तीतील वारांगनांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलींकडून व्यवसाय करवून घ्यायचा नाही, रस्त्यावर उभे राहून हातवारे करायचे नाही, असे केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा नोटीसच येथे लावण्यात आली. त्याला दाद न दिल्यामुळे पोलिसांनी येथे छापामार मोहीम सुरू केली आहे. पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. त्यामुळे वारांगनांंमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी १२.३० च्या सुमारास पोलिसांनी येथे छापा घातला. उभ्या असलेल्या वारांगनांकडे पोलीस लाठ्या घेऊन धावल्यामुळे येथे धावपळ उडाली. तेवढ्यातच बांधकाम सुरू असलेली एक भिंत कोसळल्याने ४० वर्षीय महिला जबर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलिसांच्या नावे शिमगा
या घटनेमुळे येथील वातावरण संतप्त झाले. वारांगनांनी पोलिसांच्या नावाने शिमगा केला. प्रौढ वारांगनांनी तर अक्षरश: थयथयाट केला. या वयात कोणते काम करायचे, कुठे राहायला जायचे, असा त्यांचा सवाल होता.
----