भारतात कोरोनाचा फैलाव वाढला, पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीसाठीचा दौरा रद्द केला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:53 PM2021-05-11T22:53:27+5:302021-05-11T22:54:48+5:30

G 7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी ७ संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत.

G 7 Summit: Corona spread in India, Prime Minister Modi cancels G-7 visit | भारतात कोरोनाचा फैलाव वाढला, पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीसाठीचा दौरा रद्द केला 

भारतात कोरोनाचा फैलाव वाढला, पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीसाठीचा दौरा रद्द केला 

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी ७ संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत. देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आपला ब्रिटन दौरा रद्द केला आहे. ( corona virus) ही माहिती मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिली. जी-७ बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नरेंद्र मोदींना निमंत्रित केले होते. (Corona spread in India, Prime Minister Modi cancels G-7 visit)

 परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आले की, आम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून देण्यात आलेल्या जी-७ देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठीच्या निमंत्रणाची प्रशंसा करतो. मात्र देशातील कोरोनाच्या संसर्गाची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-७ देशांच्या बैठकीत व्यक्तिगतरीत्या सहभागी होणार नाहीत. 

भारत हा जी-७ देशांचा सदस्य नाही आहे. मात्र ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या देशांच्या बैठकीला सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण पाठवले होते. जी-७ देशांचे संमेलन ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ जून ते १३ जूनदरम्यान आयोजित होणार आहे. जी-७ देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: G 7 Summit: Corona spread in India, Prime Minister Modi cancels G-7 visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app