शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

एअर इंडियाचे भवितव्य ठरवेल हवाई वाहतुकीचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 03:08 IST

नवीन वर्षात एअर इंडियाला खरेदीदार मिळणार का आणि जेट एअरवेज पुन्हा टेक ऑफ घेणार का, या प्रश्नांच्या उत्तरातच हवाई प्रवासाच्या खर्चाचे गणित अवलंबून राहणार आहे.

- खलील गिरकरभारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचे भवितव्य एअर इंडियाच्या भवितव्याशी बांधलेले आहे. नवीन वर्षात एअर इंडियाला खरेदीदार मिळणार का आणि जेट एअरवेज पुन्हा टेक ऑफ घेणार का, या प्रश्नांच्या उत्तरातच हवाई प्रवासाच्या खर्चाचे गणित अवलंबून राहणार आहे. २०१९ हे वर्ष भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासाठी वाईट ठरले. त्यामुळे २०२० हे वर्ष भारतीय हवाई क्षेत्रासाठी प्रगतीची नवी उड्डाणे घेणारे ठरावे, अशी अपेक्षा आहे.नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. या विमानतळाच्या उभारणीचे महत्त्वपूर्ण काम पुढील टप्प्यात प्रवेश करील. मुंबई विमानतळाची सध्याची ४८ दशलक्ष प्रति वर्ष प्रवाशांची क्षमता लक्षात घेता २०३० मध्ये ही संख्या १०० दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष होऊ शकते.११६० हेक्टर क्षेत्रात उभारण्यात येणाºया या विमानतळामध्ये दोन स्वतंत्र व समांतर धावपट्ट्या असणार आहेत. पूर्ण ११६० हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून सिडकोकडे त्याचा ताबा आहे. ७ गावांमधील २,६३३ घरांपैकी २,३९८(९१ टक्के) घरांचे निष्कासन झाले आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दुसºया टप्प्यात सिंधुदुर्ग, गोंदिया, अमरावती, रत्नागिरी येथील विमानतळे समाविष्ट करण्यात आली असून, त्यापैकी सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ मार्च, २०२० पर्यंत सुरू होईल. विमानतळ विकास प्राधिकरणाने नागपूर व शिर्डी येथे ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित केले आहे.एक हजार नवीन मार्गावर विमानसेवाउडान ४.० मध्ये देशातील ३० विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर पूर्व विभागाला जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालया, त्रिपुरा या राज्यांतील ज्या ठिकाणी विमानसेवा उपलब्ध नाही, ती ठिकाणे हवाई मार्गाने जोडली जातील. याशिवाय लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील विभागांना उडानद्वारे जोडण्यात येईल. पाच वर्षांत देशात १०० विमानतळांच्या माध्यमातून १ हजार नवीन मार्गांवर सेवा सुरू करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.प्रॅट अँड व्हिटनी इंजीनप्रॅट अँड व्हिटनी इंजीन असलेल्या सर्व विमानांमधील इंजीन ३१ जानेवारी, २०२० पर्यंत बदलण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात प्रॅट अँड व्हिटनी इंजिनामुळे विमान प्रवासात येणाºया अडचणी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.हवाई वाहतूक व्यवस्थापन सुधारणारएअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियातर्फे टेलिकम्युनिकेशन्समध्ये पायाभूत सुविधा वाढविण्याचे प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून फ्युचरिस्टिक टेलिकम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम २०२० मध्ये सुरू होईल. त्यासाठी ९४५ कोटी रु पयांचे कंत्राट अमेरिकन कंपनीला देण्यात आले आहे.नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने पुढील पाच वर्षांत देशभरात १०० पेक्षा जास्त विमानतळांच्या माध्यमातून एक हजार मार्गांवर हवाई वाहतूक सुरू करून देशात सर्वत्र हवाई वाहतूक पोहोचविण्याचे ध्येय बाळगले आहे. ज्या मार्गांवर जास्त वाहतूक केली जाणे शक्य असेल, अशा मार्गांचा यामध्ये प्राधान्याने विचार केला जात आहे.- उषा पढी, संयुक्त सचिव, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, नवी दिल्ली

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया