शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब; विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 06:03 IST

राफेल, मंदिर, कावेरी पाणीवाटपावरून खडाजंगी

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराची उभारणी, कावेरी पाणीवाटप तंटा, राफेल विमाने खरेदी व्यवहारामध्ये झालेला कथित घोटाळा, अशा काही मुद्यांवरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातल्याने गुरुवारी लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.सलग दुसऱ्या दिवशीही तहकुबीची नामुष्की ओढवली आहे. अयोध्येच्या राममंदिर बांधणीसाठी कायदा करा, अशी मागणी करीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. शिवसेनेचे आनंद अडसूळ म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. मात्र, शिवसेना, भाजप या पक्षांची ज्या विचारांमुळे युती झाली, त्या हिंदुत्वालाच भाजपा विसरला आहे. ज्या महिलांवर त्यांच्या माहितीतील व्यक्तीने बलात्कार केलेला आहे, असे खटले लवकर निकाली काढा, असा मुद्दा भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनी उपस्थित केला.हक्कांचे रक्षण कराराज्यसभेत अण्णाद्रमुक व टीडीपीचे सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होऊन जोरदार घोषणा देऊ लागले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी टीडीपीच्या काही खासदारांनी केली.कावेरी पाणी वाटपप्रकरणी तामिळनाडूच्या हक्कांचे रक्षण करा, असे फलक अण्णाद्रमुकच्या खासदारांनी हाती धरले होते. हा गदारोळ नंतर खूपच वाढल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

टॅग्स :ParliamentसंसदRafale Dealराफेल डीलRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसBJPभाजपा