शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

लडाखवासीयांची इच्छा पूर्ण; परंतु कारगिलला लेहपासून व्हायचे आहे वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:01 IST

केंद्र सरकारच्या निर्णयाने लडाखवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण

- सुरेश डुग्गर जम्मू : लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने लडाखवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी अनेक वर्षे ज्या मागणीसाठी आंदोलने केली, ती मागणी आता पूर्ण झाली आहे. परंतु हा आनंद केवळ लेहच्या लोकांनाच आहे. कारगिलचे लोक तर लेहपासून वेगळे होऊ इच्छित आहेत. लडाखमध्ये लेह व कारगिल हे दोन जिल्हे आहेत.लडाखला काश्मीरपासून वेगळे करावे व स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी १९४७ पासून जोरकसपणे केली जात होती. आता भाजपने ही मागणी पूर्ण करून आपले वचन पूर्ण केले आहे. १९८९मध्ये लडाख बुद्धिस्ट असोसिएशनने आपल्या स्थापनेच्या वेळीच एकजूट होऊन यासाठी आंदोलन छेडले होते. केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीवर लेह व कारगिल जिल्ह्यांतील राजकीय पक्षांबरोबर लोकही एकजूटपणे उभे राहिले होते. २००२मध्ये लडाख युनियन टेरीटरी फ्रंटच्या स्थापनेनंतर या मागणीवरून राजकारण तापले होते. २००५मध्ये फ्रंटने लेह हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या २६ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर लडाखने या मागणीबाबत कधीच मागे वळून पाहिले नाही. या मुद्द्यावर २००४, २०१४ व २०१९मध्ये लडाखने खासदार जिंकून देऊन दिल्लीत पाठवले होते. २००४मध्ये फ्रंटचे उमेदवार थुप्स्तन छेवांग खासदार झाले होते. त्यानंतर ते २०१४मध्ये भाजप उमेदवाराच्या स्वरूपात लडाखहून पुन्हा खासदार झाले होते. आता २०१९मध्ये फं्रटची मागणी घेऊन भाजपचे उमेदवार जामियांग त्सीरिंग नांग्याल खासदार झाले आहेत.असा आहे नवीन केंद्रशासित प्रदेश लडाखलडाख एक उंच पठार आहे. त्याचा बहुतांश भाग ३,५०० मीटर (९,८०० फूट) उंच आहे. हा भाग हिमालय, कराकोरम पर्वतराजी व सिंधू नदीच्या वरील खोऱ्यात पसरलेला आहे. सुमारे ३३,५५४ वर्गमैलमध्ये पसरलेल्या लडाखमध्ये वास्तव्य करण्यासारखी जागा खूपच कमी आहे. येथे सर्वत्र उंच-उंच विशालकाय दगडाचे पर्वत व मैदाने आहेत. येथील सर्व धर्मांच्या लोकांची संख्या एकूण २,३६,५३९ आहे.लडाख हा मूळ रूपाने एका मोठ्या तलावाचा बुडाचा भाग आहे, असे मानले जाते. अनेक वर्षांच्या भौगोलिक उलथापालथीनंतर हा भाग लडाख खोरे बनला. १८व्या शतकामध्ये लडाख व बाल्टिस्तानचा जम्मू-काश्मीरमध्ये समावेश करण्यात आला.लडाखच्या पूर्व भागात लेहच्या परिसरात मुख्यत: असलेल्या रहिवाशांमध्ये तिबेटी, बौद्ध व भारतीय हिंदू आहेत. लडाखच्या पश्चिम भागात कारगिलच्या परिसरातील लोकसंख्या मुख्यत: भारतीय शिया मुस्लिमांची आहे. तिबेटवरील कब्जाच्या काळात अनेक तिबेटी येथे वास्तव्यास आले. चीनचा असा दावा आहे की, लडाख हा तिबेटचा भाग आहे. सिंधू नदी लडाखहून निघून पाकिस्तानच्या कराचीपर्यंत वाहते. प्राचीनकाळी लडाख हे अनेक महत्त्वाच्या व्यापारी रस्त्यांचे प्रमुख केंद्र राहिलेले आहे.लडाख एकेकाळी मध्य आशियाच्या व्यावसायिक उलाढालींचा बालेकिल्ला होता. सिल्क रूटचीएक शाखा लडाखमधून जात होती. इतर देशांतून शेकडो उंट, घोडे, खेचर, रेशीम व गालिचे येथे आणले जात होते तर भारतातून येथे रंग, मसाल्यांची विक्री केली जात होती. तिबेटहून याकवर लोकर, पश्मीना आदी घेऊन लोक लेहपर्यंत येत होते. येथून काश्मीरपर्यंत आणून खास प्रकारच्या शाल तयार केल्या जात होत्या.थुप्स्तन छेवांग विजयाचे खरे शिल्पकारलडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या मुद्द्यावर दोन वेळा खासदार झालेले थुप्स्तन छेवांग हे लडाखच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. मागील ४० वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशाच्या मागणीसाठी अनेक घडामोडी करणाºया छेवांग यांनी १९८९मध्ये लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे नेतृत्व केले. त्यांनी २००२मध्ये लडाख युनियन टेरीटरी फ्रंट तयार करण्यातही मोठी भूमिका निभावली होती.लडाख केंद्रशासित प्रदेशाची मागणी पूर्ण करण्यासाठी फं्रटने भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये गेल्यानंतरही २०१४मध्ये खासदाराच्या भूमिकेतून छेवांग यांनी आपल्या मागणीसाठी भाजपवर सतत दबाव निर्माण केला. एनडीएच्या पहिल्या सरकारमध्ये आपली मागणी पूर्ण होत नाही, असे पाहून त्यांनी याचा निषेध करण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. त्यांची कितीही मनधरणी केली तरी ते २०१९मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहिलेच नाहीत.आता लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयाने आनंदित झालेल्या छेवांग यांनी सांगितले की, आमच्या प्रदेशाची एक खूप जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. भाजपने आपला वायदा पूर्ण केला आहे. लडाखमध्ये आज कोणालाही याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती की, त्यांची एवढी ७० वर्षांपासूनची मागणी एका फटक्यात पूर्ण होऊन जाईल. लडाखच्या लोकांना या विजयाचे श्रेय आहे. कारण त्यांनी एकजूट होऊन आंदोलन चालवले व या निर्णायक वेळेपर्यंत आणून सोडले.

टॅग्स :ladakhलडाख