नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या दर कपातीनंतर इंधनाच्या दरात रोजच वाढ होताना दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी (13 ऑक्टोबर) पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 31 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 88.12 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 78.82 रुपये झाला आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीत पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.66 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 77.19 रुपये वाहनधाराकांना मोजावे लागणार आहेत.
Fuel Price Hike: इंधन दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 06:59 IST