शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

इंधन दरवाढ, कृषी कायद्यांवरून विरोधक सरकारला घेरणार, संसदेचे आजपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 07:55 IST

Parliament Winter Session : संसदेच्या सोमवार, २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मांडणार आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेच्या सोमवार, २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मांडणार आहे. कृषी कायदे, पेगॅसस, इंधन दरवाढ, चीनसोबतचा तणाव अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला धारेवर धरणार असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.कृषी कायदे संसदेत रद्द करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दिले असले, तरी त्याबद्दलच्या विधेयकात काही वादग्रस्त उल्लेख आहेत. पेगॅससच्या मुद्द्यावरही केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर विरोधक नाराज आहेत. 

२५ विधेयके मांडणारतीन कृषी कायदे रद्द करणे व त्याशिवाय आणखी २५ विधेयके केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे ठरवले आहे. खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालून रिझर्व्ह बँकेद्वारा अधिकृत डिजिटल चलन सुरू करण्याबद्दलचे एक विधेयक त्यात आहे. 

सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान अनुपस्थितnसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारने रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिले. अशा बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची प्रथा नाही, असे केंद्राने सांगितले. nकिमान हमीभाव देण्याबाबतचा कायदा करा, शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाखांची भरपाई द्यावी, अशा मागण्या विरोधकांनी केल्या. 

२३ डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन- वैयक्तिक माहिती रक्षण विधेयक, २०१९बद्दल संसदेच्या संयुक्त समितीने दिलेला अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल. - या कायद्याच्या कक्षेतून सीबीआय, ईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांना वगळण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांना विरोधकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. अशा अनेक मुद्द्यांवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस