शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात पेट्रोल-डिझेल अन् LPG चा पुरवठा सुरळीत; सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:39 IST

Fuel Crisis : स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारताची 4 जहाजे बाहेर पडली, आणखी जहाजे लवकरच बाहेर पडतील.

Fuel Crisis India: पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत सरकारने विरोधी पक्षांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली.

पेट्रोल-डिझेल आणि LPG चा पुरवठा सुरळीत

बैठकीत सरकारने सांगितले की, देशात सध्या पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कोणतीही कमतरता नाही, पुरवठाही पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. काही ठिकाणी कमतरतेच्या बातम्या येत असल्या तरी त्याचे मुख्य कारण सप्लाय चेनमधील अडचणी आहेत. 

स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय जहाजे बाहेर

बैठकीत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ येथील परिस्थितीबाबत चर्चा झाली. सरकारने माहिती दिली की, आतापर्यंत भारताची 4 जहाजे सुरक्षितपणे त्या भागातून बाहेर पडली आहेत, आणखी काही जहाजे लवकरच बाहेर पडतील. अनेक देशांची जहाजे अजूनही त्या भागात अडकलेली आहेत, मात्र भारताची जहाजे सुरक्षित बाहेर येत आहेत. या घटनेला भारताच्या राजनैतिक आणि धोरणात्मक यश म्हणून पाहिले जात आहे.

सर्व पक्षांचा सरकारला पाठिंबा

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीतील चर्चेविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या बैठकीला सर्वांनी उपस्थिती लावली आणि सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व पक्षांच्या नेत्यांनी माहितीची देवाणघेवाण केली आणि आपापल्या पक्षांच्या वतीने आपल्या चिंता व्यक्त केल्या. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर कसा परिणाम होईल आणि भारतीय जनतेसाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याविषयी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अनेक प्रश्न विचारले. सरकारने या सर्व प्रश्नांना अत्यंत सविस्तर आणि सखोल उत्तरे दिली. मला हे सांगताना समाधान वाटते की, संपूर्ण विरोधी पक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली आहेत. शेवटी, विरोधी पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, या संकटाच्या काळात सरकारने जो काही निर्णय घेतला, किंवा सध्याच्या परिस्थितीनुसार जी काही पावले उचलली, त्या सर्वांना ते एकजुटीने पाठिंबा देतील.

रिजिजू पुढे म्हणाले, सरकारच्या वतीने विरोधी पक्षांच्या ज्या काही शंका होत्या किंवा जो काही संभ्रम होता, त्या सर्वांचे सरकारने अत्यंत स्पष्टपणे निरसन केले. बैठकीच्या शेवटी विरोधी पक्षांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद केली; ती म्हणजे, ही सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. त्यांनी हे देखील ठामपणे सांगितले की, अशा कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी संसदेच्या माध्यमातून असे आवाहन केले आहे की, कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय संसदेने एकजुटीने उभे राहिले पाहिजे. मला असे वाटते की, बैठकीच्या शेवटी आपले मत व्यक्त करताना विरोधी पक्षाने एक प्रकारची परिपक्वता दर्शवली आहे; ती म्हणजे, कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत सरकार उचलत असलेल्या पावलांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Supply Smooth, Government Assures All-Party Meet Amid West Asia Tensions

Web Summary : Government assures sufficient fuel supply despite West Asia tensions. All-party meeting addressed concerns about potential shortages and the safe passage of Indian ships through the Strait of Hormuz. Opposition parties pledged their support to the government's efforts.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई