पंतप्रधानांची निराशा; ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहता न आल्याने लोकांचा हिरेमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:32 AM2019-12-27T06:32:01+5:302019-12-27T06:33:02+5:30

पंतप्रधानांची निराशा; दक्षिण भारतात विलोभनीय दर्शन

The frustration of the prime minister; Haremode of people due to cloudy weather not seeing the solar eclipse | पंतप्रधानांची निराशा; ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहता न आल्याने लोकांचा हिरेमोड

पंतप्रधानांची निराशा; ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहता न आल्याने लोकांचा हिरेमोड

Next

मुंबई/नवीदिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे गुरुवारचे कंकणाकृती सूर्यग्रहण बघता न आल्याने नागरिकांचा पुरता हिरेमोड झाला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेमका असाच अनुभव आला. पंतप्रधानांना केरळमधील कोडिकोळ येथे दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहून त्यावर समाधान मानावे लागले. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सूर्यग्रहणाचे व्यवस्थित
दर्शन झाले.

गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेले हे सूर्यग्रहण जगातील अधिकाधिक भागांमध्ये पाहिले गेले. आशियातले सर्व देश तसेच आॅस्ट्रेलियामधूनही या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे व्यवस्थित दर्शन झाले. २०१९ या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण होते. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले. अग्निच्या सुवर्णकड्याच्या रुपात दिसलेले हे ग्रहण ‘रिंग आॅफ फायर' नावानेही ओळखले जाते. जगातील इतर भागांपेक्षा भारतामध्ये हे ग्रहण अधिक स्पष्टपणे पाहाता आले. त्यातही दक्षिण भारतामध्ये या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे आणखी विलोभनीय दर्शन झाले. भारतामध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी सुरू झालेल्या या ग्रहणाची कंकणाकृती अवस्था सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी दिसली.  भारतामध्ये गुरुवारी कोईमतूरमध्ये सर्वप्रथम कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. केरळमधील कन्नूर, पल्लकड, कासारगोड आदी तर कर्नाटकातील मंगळुरू, म्हैसूर या भागात तर तामिळनाडूतील काही भागांतून तर सौदी अरेबिया, कतार, मलेशिया, ओमान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशांतून गुरुवारचे कंकणाकृती सूर्यग्रहण सुस्पष्टपणे दिसले. 

वंचित राहिल्याची खंत

ढगाळ वातावरणामुळे दिल्लीतून गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहणाचे दर्शन न घेता आल्याची रुखरूख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टिष्ट्वटद्वारे व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहाण्याच्या अनुभवापासून देशातील लक्षावधी लोकांप्रमाणेच मलाही वंचित राहावे लागले. कोडिकोळ येथे दिसलेले सूर्यग्रहण थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाहिले असले तरी प्रत्यक्ष दर्शनाला आपण मुकलो, ही खंत त्यांना वाटत होती. या सूर्यग्रहणाबद्दल खगोलतज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतल्याचे ते म्हणाले. 

ग्रहण पाहातानाची मोदींची छायाचित्रे चर्चेचा विषय
गॉगल लावून व ग्रहणाचा चष्मा हातात धरून सूर्याकडे पाहात असल्याचे व तज्ज्ञांशी चर्चा करतानाची आपली छायाचित्रे मोदींनी टिष्ट्वटरवर झळकविली. गॉगल लावून सूर्याकडे पाहाणाऱ्या मोदींच्या छायाचित्रावर खूप मीम बनतील, असे एका टिष्ट्वटर वापरकर्त्याने लिहिताच मोदींनी त्यावर मोस्ट वेलकम, एन्जॉय अशी खेळकर प्रतिक्रिया दिली. या छायाचित्रावर नेटकऱ्यांनी मोदींना ट्रोल केले तसेच काही वेळाने या छायाचित्राची अनेक मीम सोशल मीडियावर झळकू लागली. पंतप्रधानांनी घातलेला गॉगल कोणत्या ब्रँडचा असून त्याची किंमत किती आहे, याचीही नेटकºयांनी चर्चा केली.

Web Title: The frustration of the prime minister; Haremode of people due to cloudy weather not seeing the solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.