पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना गेल्या काही काळामध्ये लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे अशीच धक्कादायक घटना घडली आहे. येथे पतीवर नाराज असलेल्या त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याचा प्रायवेट पार्ट कापला. एवढंच नाही तर या महिलेनं या पतीवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. तर आरोपी पत्नी घटनास्थळावरून फरार झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पतीला रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मैगलगंज कचनाव गावातील अंसार अली नावाच्या एका व्यक्तीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ज्याची कुणकुण त्याच्या दुसऱ्या पत्नीला लागली. ज्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान, रविवारी संधी साधून तिने पतीचा प्रायवेट पार्ट कापला.
दरम्यान, हे धक्कादायक कृत्य करण्यापूर्वी पत्नीने पतीला गुंगीचं औषध खाऊ घातलं. जेव्हा या औषधाच्या प्रभावाने पती जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा तिने त्याचा प्रायवेट पार्ट कापला. तसेच त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर ती घटनास्थळावरून फरार झाली. तर पतीची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.