निरीक्षकांच्या निलंबनासाठी मोर्चा वांबोरी अत्याचार प्रकरण : अटक न केल्यास महाआंदोनाचा इशारा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:03+5:302015-03-20T22:40:03+5:30
राहुरी : वांबोरी येथील घटनेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचारातील तरूणाला अटक करावी पोलिस व पुढारी यांच्यावर कारवाई करावी या मागणासाठी आज दुपारी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़काळया फिती लावून व हातात काळया गुढया घेऊन संतप्त संघटनांनी मोर्चा काढून घोषणा करीत निशेध व्यक्त केला़

निरीक्षकांच्या निलंबनासाठी मोर्चा वांबोरी अत्याचार प्रकरण : अटक न केल्यास महाआंदोनाचा इशारा
र हुरी : वांबोरी येथील घटनेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचारातील तरूणाला अटक करावी पोलिस व पुढारी यांच्यावर कारवाई करावी या मागणासाठी आज दुपारी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़काळया फिती लावून व हातात काळया गुढया घेऊन संतप्त संघटनांनी मोर्चा काढून घोषणा करीत निशेध व्यक्त केला़संत सावता माळी संघ,समता परिषद,कं्रातीज्याती प्रतिष्ठान,संभाजी ब्रिगेड,छावा संघटना,आदी वीस संघटनांनी घोषणा देत मोर्चा काढला होता़मार्चाच्यावतीने सचिन गुलदगड यांनी नायब तहसीलदार एस़एस़कदम यांना निवेदन सादर करून संबंधीतांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला़एफआयआर दाखल करण्यास विलंब करणा-या पोलिस निरिक्षक संजय पाटील यांचे निलंबन करून त्यांना सह आरोपी करावे,आरोपीला राजकीय पाठबळ देणा-यांवर कारवाइृ करावी,तपासी अधिका-यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासावे अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या़मोर्चासमोर बोलतांंना संजीव भोर म्हणाले की दोन दिवसात अत्याचार करणा-या युवकाला अटक न केल्यास तीन दिवसांनंतर भिंगार पोलिस स्टेशनमध्ये धडक मार्चा नेण्यात येईलख़ासदार दिलीप गांधी,पालक मंत्री राम शिंदे,यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा महेश बोरूडे यांनी दिला़मोर्चासमोर सचिन गुलदगड,देवेंद्र लांबे,अमोल बरबडे,पाराजी बाजकर,ज्ञानेश्वर गाडे,डॉ़धनंजय मेहेत्रे,अर्जुन सुसे,राजु आढाव यांची भाषणे झाली़यावेळी प्रभावती सत्रे,प्रशांत शिंदे,किरण अंत्रे,सतिष सौदागर,संजय संसारे,गोपीनाथ लांबे,निलेश खरपुडे आदी उपस्थित होते़ फोटो कॅप्शनअत्याचार झालेल्या वांबोरी येथील घटनेतील मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी विविध स्वयंसेवी संघटनांच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़