पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:33 IST2025-06-12T16:32:52+5:302025-06-12T16:33:40+5:30

तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात.

Front or back know about Where is the fuel tank of an airplane | पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात ही दुर्घटना घडली. विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. यानंतर, लोकांना आकाशात आगीचे आणि धुराचे लोट दिसले. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण २४२ जण होते, अशी माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
 
तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात.

कुठे असतं इंधन? -
साधारणपणे विमानांचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. यामुळे विमानांना मोठ्या प्रमाणावर इंधनाची आवश्यकता असते. आता, विमानाच्या मुख्य बॉडीत इंधन साठवले जाते, असे आपल्याला वाटत असेल तर तसे नाही. विमानाच्या दोन्ही पंखांमध्ये इंधन साठवले जाते. याचेही एक कारण आहे. ते म्हणजे, विमानाचे इंजिन त्याच्या पंखांमध्येच लावलेले असते. यामुळे येथेच इंधनाची व्यवस्था केलेल्यास ते इंजिनपर्यंत पोहोचणे सोपे होते. यामुळे विमानाचे वजनही बरेच कमी होते. याशिवाय, 

बॅलेन्स राखण्यासही उपयुक्त - 
कोणत्याही प्रवासी विमानाचे पंख हे त्याचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. कारण, जर इंधन विमानाच्या मुख्य भागात भरले, तर संतुलन बिघडेल. समजा इंधन मागच्या भागात भरले, तर हवेत असताना विमानाचा मागचा भाग खाली राहील, तर इंधन कमी झाल्यास, मागचा भाग वर येईल. यामुळे अपघातांचा धोका देखील वाढेल. तसेच अपघात झाल्यास, पंख्याजवळील प्रवाशांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो...
 

Web Title: Front or back know about Where is the fuel tank of an airplane