मसाल्यांपासून बासमती तांदळांपर्यंत..., ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे या वस्तू महागणार, भारताची निर्यात नुकसानीत जाणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 23:04 IST2025-03-06T23:03:43+5:302025-03-06T23:04:51+5:30

US Tariff Hike Impact on India: भारत आणि अमेरिकेमध्ये दृढ व्यापारी संबंध आहेत. तसेच अमेरिका हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारामधील दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे. मात्र असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची झळ भारतालाही बसण्याची शक्यता आहे.

From spices to basmati rice..., will these items become more expensive due to Trump's tariff war, and will India's exports suffer losses? | मसाल्यांपासून बासमती तांदळांपर्यंत..., ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे या वस्तू महागणार, भारताची निर्यात नुकसानीत जाणार?  

मसाल्यांपासून बासमती तांदळांपर्यंत..., ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे या वस्तू महागणार, भारताची निर्यात नुकसानीत जाणार?  

भारत आणि अमेरिकेमध्ये दृढ व्यापारी संबंध आहेत. तसेच अमेरिका हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारामधील दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे. मात्र असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची झळ भारतालाही बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने आधी कॅनडा, मेक्सिको, चीन या देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता २ एप्रिलपासून भारतावरही टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्स सरकारने घेतला आहे. या टॅरिफचा फटका भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या विविध वस्तूंना बसणार आहे. सोबतच अमेरिकेलाही या टॅरिफ वॉरचं अंशत: नुकसान होणार आहे.

टॅरिफ वाढल्याने कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. तसेच कंपन्या या वाढत्या खर्चाची वसुली ही वस्तूंच्या किमती वाढवून कऱणार आहेत. तसेच टॅरिफमुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तर त्याचा फटका अमेरिकेतील नागरिकांनाही बसणार असून, त्यांना या वस्तू चढ्या दराने खरेदी कराव्या लागणार आहेत. भारत अमेरिकेमध्ये ज्या वस्तूंची निर्यात करतो त्यामध्ये प्रामुख्याने मखाना, गोठवलेली कोळंबी, मसाले, बासमती तांदूळ, काजू, फळे, भाज्या, तेल, स्वीटनर, प्रक्रिया केलेली साखर, मेवा, धान्य, पेट्रोलियम, कच्चे हिरे, एलपीजी, सोनं, कोळसा, बदाम, संरक्षण सामुग्री, इंजिनियरिंची अवजारे, इलेक्ट्रॉनिक सामान, औषधे, आदींचा समावेश  आहे. आता अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यास या वस्तू अमेरिकेक महाग होतील, अमेरिका हा बासमती तांदूळांचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे बासमती तांदूळही अमेरिकेत महाग होईल. मात्र अमेरिकेने टॅरिफ वाढवल्याचा भारताच्या निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे. 

त्याशिवाय टॅरिफ वाढवल्याने भारतीय ज्वेलरी ब्रँड्ससाठी अमेरिकेमध्ये स्पर्धा करणं कठीण होणार आहे. अमेरिकेत मागणी असलेल्या भारतीय साड्या आणि कुर्ते टॅरिफ वाढल्याने महाग होऊ शकतात. भारतीय कंपन्यांसाठी अमेरिकेमध्ये व्यापार करणं महाग पडू शकतं. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. टॅरिफ वाढल्याने भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार तोट्यात जाऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवही विपरित परिणाम होऊ शकतो.  

Web Title: From spices to basmati rice..., will these items become more expensive due to Trump's tariff war, and will India's exports suffer losses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.