शुक्रवार अपघात वार! दोन वेगवेगळ्या अपघातात वृद्धासह युवक ठार

By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:32+5:302015-08-22T00:43:32+5:30

नाशिक : अशोकस्तंभ व सातपूर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ९० वर्षीय वृद्धा व २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या जखमीवर जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचार सुरू असून शुक्रवार हा अपघात वारच ठरला़ दरम्यान, अशोकस्तंभ परिसरात घडलेल्या अपघातानंतर सुमारे एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती़

Friday the accident! Two youths with old age killed in two different accidents | शुक्रवार अपघात वार! दोन वेगवेगळ्या अपघातात वृद्धासह युवक ठार

शुक्रवार अपघात वार! दोन वेगवेगळ्या अपघातात वृद्धासह युवक ठार

शिक : अशोकस्तंभ व सातपूर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ९० वर्षीय वृद्धा व २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या जखमीवर जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचार सुरू असून शुक्रवार हा अपघात वारच ठरला़ दरम्यान, अशोकस्तंभ परिसरात घडलेल्या अपघातानंतर सुमारे एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती़
मल्हारखाण परिसरात राहणार्‍या चंद्रभागा नारायण धात्रक (९०) या शुक्र वारी (दि.२१) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशोक स्तंभावरून घराकडे पायी जात होत्या. अशोकस्तंभावरील वाहतूक बेटाजवळून जात असताना शहर बसने (एमएच १५ एके ८०६५) त्यांना जोरात धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच १०८ क्र मांकाची ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली; मात्र स्थानिक नागरिकांनी पोलिसांना त्यांच्याच वाहनात उपचारासाठी नेण्याचा आग्रह केला. त्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनातूनच धात्रक यांना तातडीने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर सुमारे पाऊण तास परिसरातील वाहतूक कोंडी झाली होती.
दुसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली़ दुपारी एक वाजेच्या सुमारास अन्नपूर्णा हॉटेलसमोर कंटेनरला ओव्हरटेक करताना मागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वार किरण सीताराम बिरारी (२१, रा. श्रमिकनगर, माळी कॉलनी, सातपूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मावस भाऊ पवन सुनील खैरनार (१७) हा गंभीर जखमी झाला़ सातपूर औद्यागिक वसाहतीकडून दुचाकीने (एमएच १५ डीटी ९१६७) घराकडे परतताना कंटेनरला (आर ०४ जीबी ९५११) ओव्हरटेक करीत असताना हा अपघात घडला़ कंटेनरच्या मागील चाकाखाली किरण अडकला तर पवनच्या पायावरून चाक गेले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी तसेच जिल्हा रु ग्णालयात धाव घेतली़ मयत किरणच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. तो महिंद्रा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून कामास होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

मयतांचे फोटो :- आर / फोटो / २१चंद्रभागाबाई धात्रक व २१किरण बिरारी या नावाने सेव्ह केले आहेत़

Web Title: Friday the accident! Two youths with old age killed in two different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.