अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये फ्रेशर पार्टी
By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:35+5:302015-08-13T22:34:35+5:30
नाशिक : अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष बी.ए., बी.एड. व बी.एस्सी., बी.एड. च्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फे्रशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत असताना संस्थेकडून व महाविद्यालयाकडून काय अपेक्षा आहे, याबाबत मनोगत व्यक्त केले. द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए. आणि बी.एस्सी. बी.एड.च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले.

अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये फ्रेशर पार्टी
न शिक : अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष बी.ए., बी.एड. व बी.एस्सी., बी.एड. च्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फे्रशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत असताना संस्थेकडून व महाविद्यालयाकडून काय अपेक्षा आहे, याबाबत मनोगत व्यक्त केले. द्वितीय व तृतीय वर्ष बी.ए. आणि बी.एस्सी. बी.एड.च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले. प्राचार्या डॉ. विद्यागौरी जोशी यांनी भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते. महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कलागुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले.संस्थेचे संचालक कुमारदत्त गाजरे यांनी सर्व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. प्रकाश अहिरे व प्रा. स्मिता बोर्हाडे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम बघितले.