Prophet Row : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा ट्रेनवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 22:53 IST2022-06-12T22:53:25+5:302022-06-12T22:53:33+5:30
Prophet Row : नुपूर शर्मांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही.

Prophet Row : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा ट्रेनवर हल्ला
Prophet Row : भाजपतून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या ल्नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशात सुरू झालेला हिंसक निदर्शनांचा प्रकार अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही. पश्चिम बंगालमधील हावडा येथे झालेल्या हिंसाचारानंतर रविवारी नादिया जिल्ह्यात निदर्शनाला हिंसक वळण लागले. नादिया जिल्ह्यातील बेतुआधारी रेल्वे स्थानकावर सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने रेल्वेवर हल्ला केला. लोकांनी ट्रेनवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर स्थानकावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच काही रिपोर्ट्सनुसार काही समाजकंटकांनी आसपासच्या दुकानांचंही नुकसान केलं.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने आंदोलक रस्ता अडवत होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता काही जण रेल्वे स्थानकात घुसले आणि त्यांनी रेल्वेवर दगडफेक सुरू केली. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे लालगोला मार्गावरील सेवा ठप्प झाली. पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातही हिंसाचार झाला आहे.
पश्चिम बंगाल: नादिया ज़िले के बेथुआडहरी रेलवे स्टेशन पर प्रदर्शनकारियों ने लोकल ट्रेन को क्षतिग्रस्त कर दिया। प्रदर्शनकारी नूपुर शर्मा के बयान का विरोध कर रहे थे। pic.twitter.com/WZrAFiLJVr
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2022
हावडा येथेही एक दिवसापूर्वी हिंसाचार झाला होता. यानंतर मेदिनीपुरीत राजकीय नाट्य सुरू झाले. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना प्रशासनाकडून पत्र देऊन हावडा येथे न जाण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी अधिकारीही तेथील भाजप कार्यालयावर हल्ला झाला असल्याने हावडा येथे जाणे हा आपला हक्क असल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम होते. जर आपल्याला थांबवण्यात आलं तर आपण न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला होता. हावडामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.