शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Sandeshkhali : संदेशखळीत गोंधळ, संतप्त लोकांनी शहाजहानच्या ठिकाणांवर लावली आग; भाजपा नेत्यांची पोलिसांशी झटापट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:17 IST

Sandeshkhali Row : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले. 

Sandeshkhali Row (Marathi News) संदेशखळी प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून अशांत असलेल्या संदेशखळीमध्ये पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी सकाळी संतप्त लोकांनी फरार टीएमसी नेता शहाजहान शेखच्या ठिकाणांवर आग लावली. ज्या ठिकाणावर लोकांनी आग लावली, ती जागा शाहजहान शेखचा भाऊ सिराजची असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले. 

भाजपाच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ पीडित महिला आणि स्थानिक लोकांची भेट घेण्यासाठी आज संदेशखळी दौऱ्यावर आहे. यावेळी भाजपाचे शिष्टमंडळ संदेशखळी येथे जाताना पोलिसांना त्यांना अडविले. यादरम्यान भाजपा नेत्या आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजपाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा प्रदेश युनिटचे सरचिटणीस लॉकेट चॅटर्जी आणि अग्निमित्रा पॉल करत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे शिष्टमंडळही आज संदेशखळीला भेट देणार आहे. तसेच, संदेशखळी हिंसाचारावर मानवाधिकार आयोगाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकार आणि राज्याचे डीजीपी यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

गुरुवारी राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या शिष्टमंडळानेही संदेशखळीला भेट देऊन पीडितांशी संवाद साधला. आदिवासी आयोगाच्या पथकाचे नेतृत्व आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष अनंत नायक यांनी केले. आदिवासी आयोगाकडे जमिनीवर अवैध कब्जा आणि लैंगिक शोषणाच्या २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्य आरोपी टीएमसी नेता शाहजहान शेख हा ५ जानेवारीपासून फरार आहे. तसेच, रेशन घोटाळ्याप्रकरणी ५ जानेवारीला ईडीची टीम त्याच्या आवारात छापा टाकण्यासाठी गेली होती, मात्र शाहजहान शेखच्या समर्थकांनी ईडीच्या टीमवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ईडीचे अधिकारी जखमी झाले. त्या घटनेपासून शाहजहान शेख हा फरार आहे.

शाहजहान शेखविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा रेशन घोटाळा आणि ईडी टीमवरील हल्ल्याच्या प्रकरणात अडकलेले टीएमसी नेता शाहजहान शेखच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. दरम्यान, ईडीने शाहजहान शेख विरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे. संदेशखळी येथील लोकांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेशखळीच्या लोकांनी आरोप केला आहे की, शाहजहान शेखने त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि स्थानिक महिलांनी टीएमसी नेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोपही केला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस