रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:01 IST2022-07-07T15:01:12+5:302022-07-07T15:01:24+5:30
कर्नाटकातील बिजरजवळ रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला, यात ट्रकचे मोठे नुकसान झाले.

रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
बंगळुरू: कर्नाटकातील बिदरमधील बेहलाकी क्रॉसिंगवर एक मोठा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या ट्रकला ट्रेनने जोरदार धडक दिली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, मालवाहू ट्रकला ट्रेनने जोरदार टक्कर मारली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
#WATCHकर्नाटक: बीदर के बहलकी क्रॉसिंग पर ट्रेन ट्रक से टकराई। हादसे में किसी के घायल होने की सूचना नहीं है। pic.twitter.com/K5WcfNxTGu
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2022
काय आहे संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बिदर येथील बहलकी क्रॉसिंगवर काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रक अडकला. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा ट्रक रेल्वे रुळावरून हलू शकला नाही, तेव्हा मालकाने ट्रक तिथेच सोडला. यावेळी समोरून पॅसेंजर गाडी आली आणि ट्रकला धडकली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ट्रेनचा वेग कमी होता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेन ट्रकच्या मागील बाजूस आदळली, यात फार नुकसान झाले नाही. तसेच, धडकेनंतर ट्रेनही थांबली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.