स्वातंत्र्य दिन सोहळ्यात घातपात घडविण्याचा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:40 IST2018-08-07T06:39:45+5:302018-08-07T06:40:01+5:30
दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये घातपात करण्याचा अल कायदाशी संबंधित अन्सार गझवत-उल-हिंद गटाचा कट उधळून लावल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी केला.

स्वातंत्र्य दिन सोहळ्यात घातपात घडविण्याचा कट उधळला
जम्मू : दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये घातपात करण्याचा अल कायदाशी संबंधित अन्सार गझवत-उल-हिंद गटाचा कट उधळून लावल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी केला. या गटाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एस. डी. एस. जमवाल यांनी सांगितले की, इरफान हुसैन वणी याला जम्मूतून अटक करण्यात आली. त्याच्याजवळील आठ ग्रेनेड तो दिल्लीत एका व्यक्तीला देणार होता.