Free treatment for accidental injuries; Cashless treatment even in private hospitals | अपघातांतील जखमींवर होणार मोफत उपचार; खासगी रुग्णालयांतही कॅशलेस ट्रिटमेंट

अपघातांतील जखमींवर होणार मोफत उपचार; खासगी रुग्णालयांतही कॅशलेस ट्रिटमेंट

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : रस्त्यावरील अपघातांत जखमी झालेल्याला आता खिशातून खर्च करावा लागणार नाही तर जवळच्या खासगी रुग्णालयात किंवा नर्सिंग होममध्ये मोफत उपचार घेता येतील.

परिवहन मंत्रालयाकडील या योजनेनुसार रस्ते अपघातांतील जखमींवर १.५ लाख रुपयांपर्यंतच्या  मोफत उपचारांची सोय केली जाईल. अपघातस्थळापासून रुग्णालय आणि दुसरीकडे पाठवण्याचा खर्चही सरकार सोसेल. या शिवाय रस्ते अपघातात अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचीही तरतूद करण्यात आली आहे. दुर्घटनेत मृत्यू झाल्यास ही रक्कम त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. दरवर्षी रस्ते अपघातात साडेपाच लाखांपैकी जवळपास साडेचार लाख लोकांना थेट लाभ होईल. जखमीवर उपचार करण्यासाठी पैशांची वाट पाहावी लागणार नाही. उपचारांच्या खर्चाची ही तरतूद वाहन दुर्घटना फंडमधून केली जाईल. वाहनांचा विमा करणाऱ्या जनरल इ्न्शुरन्स कंपन्यांच्या कमाईचा एक  भाग कॅशलेस उपचारांसाठी देण्याची तरतूद केली गेली आहे. 

योजना काय?
मंत्रालयाने राष्ट्रीय कॅशलेस ट्रीटमेंट योजना बनवली असून तिच्या लाभार्थीत विदेशी पर्यटक तथा तीर्थयात्रींनाही समाविष्ट केले आहे. योजनेंतर्गत एक्स्प्रेस बे, ग्रीन फील्ड एक्स्प्रेस बे, राष्ट्रीय राजमार्ग, राज्य राजमार्ग, जिल्हा तथा इतर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांत जखमी झालेले समाविष्ट असतील. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Free treatment for accidental injuries; Cashless treatment even in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.