एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:25 AM2020-03-05T06:25:28+5:302020-03-05T06:25:39+5:30

एअर इंडियाची मालकी ‘एनआरआय’ना देण्याचा मार्ग मोकळा करून सरकारने प्रक्रिया अधिक आकर्षक केली आहे.

 Free to give full ownership of Air India to 'NRI' | एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

Next

नवी दिल्ली : एअर इंडिया कंपनी अनिवासी भारतीयांना (एनआरआय) १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) मार्गाने पूर्णपणे विकत घेण्याची मुभा देण्याचे सरकारने ठरविले आहे. यासाठी ‘एफडीआय’ धोरणात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस ही तिची उपकंपनी व सिंगापूर एअरलाइन्ससोबत स्थापन केलेल्या ‘आयसॅट’ या कंपनीतील ५० टक्के भागीदारी निर्गुंतवणुकीने खासगी खरेदीदारास विकण्याचा निर्णय सरकारने आधी घेतला आहे. परंतु अनुकूल प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एअर इंडियाची मालकी ‘एनआरआय’ना देण्याचा मार्ग मोकळा करून सरकारने प्रक्रिया अधिक आकर्षक केली आहे.
अन्य भारतीय विमान कंपन्यांत १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीस मुभा आहे. मात्र एअर इंडियाची भांडवल गुंतवणूक व मालकी विदेशी व्यक्ती वा कंपनीकडे जाणार नाही, अशा ‘एफडीआय’ला मंजुरी होती. आता त्यात सरकारने बदल केला आहे. जे ‘एनआरआय’ आहेत त्यांना एअर इंडिया १०० टक्के मालकीने विकत घेण्याची मुभा आहे. ‘एनआरआयची गुंतवणूक भारतीयाने केल्याचे मानले जाईल. त्यामुळे एअर इंडियावरील सरकारी मालकी गेली तरी नवा मालक भारतीयच राहील.

Web Title:  Free to give full ownership of Air India to 'NRI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.