नवी दिल्ली - पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावात केंद्र सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकार PNG विस्तारावर काम करत असून PNG कनेक्शन वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यातच तेल कंपन्यांनी पीएनजी पुरवठा करण्यासाठी सिक्युरिटी फीदेखील माफ केल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे.
सुजाता शर्मा यांनी सांगितले की, दिल्लीत रस्ते दुरुस्ती शुल्क माफ करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पाईपलाईन दिवसाचे २४ तास, रात्रंदिवस टाकल्या जाऊ शकतात. त्याशिवाय केंद्र सरकारकडून आणखी एक मोठी घोषणाही करण्यात आली आहे. नवीन पीएनजी कनेक्शनसाठी ५०० रूपयांपर्यंत मोफत गॅस आणि सुरक्षा शुल्क माफी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पीएनजी कनेक्शनच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. नव्या गॅस कनेक्शनवर ५०० रूपयांचा मोफत गॅस आणि सिक्युरिटी चार्ज येत्या ३१ मार्चपर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी ऑफर असणार आहे.
LPG चा पुरेसा पुरवठा
तर घरगुती LPG गॅस पुरवठ्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. काळा बाजार करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. ज्यातून अनेक राज्यांत २४ मार्चपर्यंत २७०० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. २ हजार सिलेंडर जप्त करण्यात आले. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एलपीजी पुरवठा पर्याप्त आहे. रिफायनरी कंपन्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. भारताकडे एकूण २६ कोटी टन रिफायनरी क्षमता आहे अशी माहितीही देण्यात आली.
दरम्यान, दिल्ली सरकारने PNG कनेक्शनसाठी २४ तास काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. अर्ज शुल्क आणि वेळ मर्यादा सुरळीत केली जात आहे. मागील २५ दिवसांमध्ये २.५० लाख नवीन पीएनजी कनेक्शन जारी करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. LPG रिफिलसाठी कमीत कमी ९२ टक्के बुकिंग ऑनलाईन करण्यात आले होते. आजही दररोज बुकींग सुरू आहे. २६ राज्यांना २२ लाख टन व्यावसायिक एलपीजी पुरवठा वितरित करण्यात आला आहे.
Web Summary : Central government announces free gas up to ₹500 and waived security deposits for new PNG connections until March 31. This initiative aims to expand PNG connections and streamline LPG supply nationwide, addressing potential shortages and black market activities. Refineries are operating at full capacity.
Web Summary : kendr sarakar ne 31 march tak nae png kanekshan par 500 rupaye tak muft gas aur suraksha jama maph karane kee ghoshana kee. isaka uddeshy png kanekshan ka vistaar karana, lpg aapoorti ko suvyavasthit karana aur kaalaabaajaaree ko rokana hai. riphainaree pooree kshamata se kaam kar rahee hain.