शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Coronavirus: कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:43 PM

Coronavirus कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रापाठोपाठ पंजाबमध्येही कोरोनाचा बळी

ठळक मुद्देकोरोनामुळे आतापर्यंत देशात चार जणांचा मृत्यूपंजाबमध्ये ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यूजगात कोरानामुळे मृत पावलेल्यांची संख्या ९ हजारांपेक्षा जास्त

चंदिगढ/नवी दिल्ली: कोरोनामुळे पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचलीय. याआधी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पंजाबमध्ये एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच जर्मनीहून इटलीमार्गे परतली होती. पंजाबमधल्या नवानशहर जिल्ह्यातल्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. छातीत तीव्र वेदना होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनामुळे जगभरात ९,११५ जणांचा मृत्यू झालाय. यातील सर्वाधिक मृत्यू चीनमधले आहेत. चीनच्या वुहानमधूनच कोरोना जगभरात पसरला. चीन, इटली आणि इराणमध्ये आतापर्यंत ७ हजार ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी (काल) एकट्या इटलीत कोरोनामुळे ४७५ जणांचा मृत्यू झाला. जगभरात आतापर्यंत २ लाख १९ हजार ३२ जणांना कोरोनाची लागण झालीय. तर भारतात १७१ जणांचा कोरोनाचा संसर्ग झालाय. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक ४९ जणांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू