सध्याच्या धावपळीच्या काळात प्रवासादरम्यान, ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा टॅक्सीमध्ये अनेकजण आपल्या जवळच्या वस्तू नकळतपणे विसरतात. मात्र कॅबमधून प्रवास करत असलेले आई-वडील चक्क आपल्या चार वर्षांच्या मुलालाच कॅबमध्ये विसरून घरी पोहोचल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. घरी पोहोचल्यावर आपल्यासोबत आपला मुलगा नसल्याचे पाहून त्यांच्या पायाखालील वाळूच सरकली. त्यानंतर याबाबत पोलिसांना खबर करण्यात आली. तसेच पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून या मुलाला ताब्यात घेतले आणि आई वडिलांच्या स्वाधीन केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बंगळुरूमधील हेन्नूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जियान चुंगी नावाचा एक चार वर्षांचा मुलगा त्याची आई गिन्नी आणि पाच नातेवाईकांसोबत इस्कॉन मंदिरात गेला होता. घरी परतताना या मुलाच्या आईने प्रवासासाठी एक कॅब बुक केली. यादरम्यान, जियान हा कॅबमध्येच झोपला. दरम्यान, पोन्नप्पा लेआऊट अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर कुटुंबातील सर्वजण कारमधून उतरले. मात्र मुलगा मागे कारमध्येच राहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. कारचालक किरण यालाही याची काही कल्पना नव्हती. त्याने आणखी दोन ट्रिप पूर्ण केल्या.
इकडे घरी परतल्यावर आपला मुलगा कारमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कॅब सर्व्हिसच्या कस्टमर केअरला फोन केला. मात्र तिथून काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी राज्याच्या आपातकालीन हेल्पलाईन ११२ वक फोन केला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या केलेल्या तपासणीमधून कॅबचा नोंदणी क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी एमसीसीटीएनएस अॅपचा वापर करून कॅबच्या मालकाचा संपर्क क्रमांक शोधून काढला आणि किरण नावाच्या या ड्रायव्हरशी संपर्क साधला. मात्र आपल्या कॅबमध्ये एक मुलगा झोपलेला आहे, याची त्याला काहीही कल्पना नव्हती. फोन आल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले तर तिथे एक मुलगा झोपलेला होता. पोलिसांनी त्या मुलाला झोपेतून न उठवता पुन्हा अपार्टमेंटमध्ये ये असे या ड्रायव्हरला सांगितले. त्यानंतर सदर कॅबचालक या मुलाला घेऊन सोसायटीमध्ये आला आणि तासभर रंगलेल्या या थरारानंतर सदर मुलगा पुन्हा आई वडिलांच्या कुशीत विसावला. आता या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.
Web Summary : Bengaluru parents forgot their four-year-old son in a cab. Realizing their mistake after reaching home, they alerted police. Police quickly located the boy and reunited him with his relieved parents after the driver completed two trips.
Web Summary : बेंगलुरु में माता-पिता अपनी चार साल के बेटे को कैब में भूल गए। घर पहुंचने पर गलती का एहसास हुआ, पुलिस को सूचित किया। पुलिस ने तुरंत लड़के का पता लगाया और ड्राइवर के दो यात्राएं पूरी करने के बाद उसे माता-पिता से मिला दिया।