शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

चौधरी चरण सिंह यांच्यासह चार दिग्गजांना 'भारतरत्न' प्रदान, आडवाणी यांना घरी जाऊन सन्मानित करणार राष्ट्रपती मुर्मू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:42 IST

महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या सन्मानाने सन्मानित कणार आहेत.

महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 53 जणांना भारतरत्न देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारीला लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. आता आडवाणी 96 वर्षांचे आहेत आणि ते आजारीही असतात. यामुळे राष्ट्रपती दौपदी मुर्मू 31 मार्चला त्यांच्या निवासस्तानी जाऊन त्यांना भारतरत्नने सन्मानित करतील. अटल बिहारी वाजपेयी आणि नानजी देशमुख यांच्यानंतर आडवाणी असे तिसरे आरएसएसशी संबंधित नेते आहेत, ज्यांना भारतरत्न देण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे, पीव्ही नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळातच देशाने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि भारताची अर्थव्यवस्था संपूर्ण जगासाठी खुली करण्यात आली. यामुळे त्याला नव्या युगाचे प्रवर्तक म्हटले जाते. चौधरी चरणसिंग हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. तसेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखले जाते. ते दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. साधी राहणी आणि उच्च विचार यांमुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

टॅग्स :Bharat Ratnaभारतरत्नDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा