दुर्गापूर प्रकरणात चौघांना न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 08:00 IST2025-10-23T08:00:27+5:302025-10-23T08:00:47+5:30
उपविभागीय न्यायालयाने चारही आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

दुर्गापूर प्रकरणात चौघांना न्यायालयीन कोठडी
दुर्गापूर (प. बंगाल): वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना बुधवारी दुर्गापूर न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. ओडिशाची रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीवर १० ऑक्टोबर रोजी खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात मित्रासोबत भोजनासाठी गेली असता नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता.
उपविभागीय न्यायालयाने चारही आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. या विद्यार्थिनीच्या मित्राचाही त्यात समावेश आहे. पीडितेच्या बयाणाच्या आधारावर तिच्या मित्राला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण सहा जणांना पोलिस कोठडी पाठविले होते. पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर तिचे वडील दुर्गापूरला पोहोचले होते.