मध्यान्ह भोजन बनवताना स्वयंपाकघरात बॉयलरचा स्फोट, चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 11:09 IST2019-11-16T11:08:24+5:302019-11-16T11:09:08+5:30
एका एनजीओच्या स्वयंपाकघरात बॉयलर फुटून स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

मध्यान्ह भोजन बनवताना स्वयंपाकघरात बॉयलरचा स्फोट, चार जणांचा मृत्यू
मोतिहारी (बिहार) - बिहारमधील मोतिहारी येथे आज सकाळी एका एनजीओच्या स्वयंपाकघरात बॉयलर फुटून स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून, पाचपेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Motihari: Four people have died and more than five have been injured after a boiler exploded in an NGO's kitchen in Sugauli, early morning today. Injured have been admitted to hospital. #Biharpic.twitter.com/JC6gsn68MO
— ANI (@ANI) November 16, 2019
मोतिहारीमधील सुगौली येथे एका एनजीओच्या स्वयंपाकघरात ही दुर्घटना घडली. स्वयंपाकघरात शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यात येत होते. त्याचदरम्यान बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.