फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन भिंत कोसळली, चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 12:56 IST2018-09-29T12:55:21+5:302018-09-29T12:56:26+5:30

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

four people dead, two injured in wall collapse due to refrigerator compressor blast, in Gwalior | फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन भिंत कोसळली, चौघांचा मृत्यू

फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन भिंत कोसळली, चौघांचा मृत्यू

ग्वाल्हेर - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



शनिवारी (29 सप्टेंबर) सकाळी ग्वाल्हेरच्या दर्पण कॉलनीत ही घटना घडली. कॉलनीतील एका घरात असलेल्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंत कोसळली. तसेच या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांना ही हादरा बसल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Web Title: four people dead, two injured in wall collapse due to refrigerator compressor blast, in Gwalior