चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 10:28 IST2021-06-29T10:28:08+5:302021-06-29T10:28:38+5:30

चिंतेत भर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

Four more variants will be dangerous of corona virus | चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या चार नव्या व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये बी. १.६१७.३, डेल्टा व्हेरिएंट (बी.१.६१७.२), बी. १.१.३१८ आणि लॅम्बडाचा (सी.३७) समावेश आहे

नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आता आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डेल्टा प्लस (बी. १.६१७.२.१) सोबतच कोविड १९ चे किमान चार नवे व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतात, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोना विषाणूच्या चार नव्या व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये बी. १.६१७.३, डेल्टा व्हेरिएंट (बी.१.६१७.२), बी. १.१.३१८ आणि लॅम्बडाचा (सी.३७) समावेश आहे. कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. कोरोनाच्या कापा व्हेरिएंटवरही (बी१.६१७.१) लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र, हा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या तुलनेत कमी संक्रमक आहे. कोरोनाचे बी. १.६१७.३ आणि बी. १.१.१.३१८ व्हेरिएंट भारतात आढळून आले आहेत. मात्र, लॅम्बडा व्हेरिएंटचा रुग्ण अद्याप तरी आढळलेला नाही. लॅम्बडा व्हेरिएंट जगातील बऱ्याच देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीमुळे या व्हेरिएंटसह नव्या व्हेरिएंटचे कॉकटेल भारतात येऊ शकते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नव्या रूपांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी जीनोम सिक्वन्सिंग करण्याची गरज आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...

nम्युटेशन झाल्यानंतर विषाणूचा फैलाव वाढतो. त्यांच्या संक्रमणाच्या वेगात वाढ होते. त्यामुळे जीनोम सिक्वन्सिंग वाढविण्याची गरज असल्याचे मत 
हैदराबादमधील यशोदा रुग्णालयाचे सल्लागार डॉ.विघ्नेश नायडू यांनी व्यक्त केले. 

nलॅम्बडा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. 
nभारतात लॅम्बडाचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. जीनोम सिक्वन्सिंग वाढविल्यास कदाचित याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकेल. 
nआंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक वाढल्यास लॅम्बडा व्हेरिएंट भारतात शिरकाव करू शकेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: Four more variants will be dangerous of corona virus