अबुझमदमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार मुले जखमी; एका मुलीच्या मानेला गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:00 IST2024-12-18T12:56:46+5:302024-12-18T13:00:39+5:30

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत चार अल्पवयीन मुले जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Four minors injured in an encounter with Naxalites in Abujhmad Chhattisgarh | अबुझमदमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार मुले जखमी; एका मुलीच्या मानेला गंभीर दुखापत

अबुझमदमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार मुले जखमी; एका मुलीच्या मानेला गंभीर दुखापत

Abujhmad Encounter :छत्तीसगडच्या अबुझमद भागात १२ डिसेंबर रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याचा दावा छत्तीसगडपोलिसांनी केला होता. त्यावेळी कोणीही नागरिक जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आता या चकमकीत ४ मुलेही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळी लागल्याने एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  नक्षलवाद्यांशी अल्पवयीन मुलांना ढाल वापरून गोळीबार केला होता.

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार अल्पवयीन मुलांनाही गोळ्या लागल्या होत्या. नक्षलवादी नेता रामचंद्र उर्फ ​​कार्तिकला वाचवण्यासाठी नक्षलवाद्यांनी मुलांचा ढाल म्हणून वापर केल्याचा पोलिसांचा दावा आहे. आता पोलिसांना गोळी लागल्याची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. गंभीर जखमी असलेल्या मुलीच्या गळ्यात एक बाहेरील वस्तू आढळून आली होती.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, १६ डिसेंबरच्या रात्री उशिरा अल्पवयीन मुलीला रायपूरमधील मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जखमी मुलीला दुसऱ्या शहरातील हॉस्पिटलमधून इथं आणण्यात आलं होतं. या चकमकीत चार अल्पवयीन मुलांना चकमकीत जखमा झाल्या. माओवाद्यांनी गोळीबार केलेल्या बॅरेल ग्रेनेड लाँचरमधून या जखमा झाल्या आहेत. एका मुलीच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे तिला रायपूरला हलवण्यात आले आहे. मुलांना जखमी केल्याप्रकरणी माओवाद्यांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तिथे काय झाले हे मला माहीती नाही. माझी मुलगी शेतात गेली असता तिच्यावर कशानेतरी हल्ला केला आणि ती बेशुद्ध झाली. मग आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी आम्हाला इथे पाठवले, अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली. जखमी मुलीला उपचारासाठी विजापूर येथील भैरमगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. यानंतर तिला ११३ किमी दूर असलेल्या जगदलपूर  येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मुलीला ३०५ किमी दूर असलेल्या रायपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं.

"मुलगी भाग्यवान असून हे दुर्मिळ प्रकरण आहे. मुलीची प्रकृती स्थिर आहे. सध्या तिच्या नसा सुरक्षित आहेत. पण बाहेरील वस्तू  अतिशय नाजूक ठिकाणी अडकली आहे. शस्त्रक्रियेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल," असं डॉक्टरांनी सांगितले. तर इतर तीन मुले जखमी आहेत. त्यांच्या मानेवर आणि पाठीवरही जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Web Title: Four minors injured in an encounter with Naxalites in Abujhmad Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.