धक्कादायक! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:36 IST2018-07-03T18:29:31+5:302018-07-03T18:36:56+5:30

मोबाईलवर पॉर्न पाहून 4 अल्पवयीन मुलांनी एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे

Four boys accused of raping four year old girl sent to juvenile home | धक्कादायक! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

धक्कादायक! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

कानपूर : विनयभंग, बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मोबाईलवर पॉर्न पाहून 4 अल्पवयीन मुलांनी एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व आरोपी सहा ते दहा वर्ष वयोगटातील आहेत. चारही मुलांविरोधात पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 

कानपूरमधील महाराजपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख राकेश मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (30 जून) चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. मुलीच्या वडिलांनी 2 जुलै रोजी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुलगी बेशुद्ध अवस्थेत एका शेतात सापडली. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर मुलीने  तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगताच सर्वांना धक्का बसला.



मौर्य यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील  एक आरोपी हा 12 वर्षाचा असून इतर तीन आरोपी हे  सहा ते दहा वर्षांचे असल्याचं सांगितलं. तसेच चारही मुलांना न्यायालयात हजर करण्यात आले असून या सर्वांना बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले आहे. 

Web Title: Four boys accused of raping four year old girl sent to juvenile home