शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेसाठी दिली 40 लाखांची फॉर्च्यूनर, आमदारानं दाखवलं मोठं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 08:26 IST

गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली.

ठळक मुद्देमंगळवारी रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपली गाडी आरोग्य विभागाकडे दिली. तेव्हापासून रुग्णावाहिका म्हणून या गाडीचा उपयोगही सुरू झाला आहे.

जयपूर - देशावरील कोरोना महामारीच्या संकटात प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मदतीसाठी खारीचा आणि सिंहाचा वाटा उचलण्यात येत आहे. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धडपड करण्यापासून ते गरिबांच्या घरातील चूल पेटली पाहिजे, हाही विचार समाज कार्यातून दिसून येत आहे. कुठे औषधांचा काळाबाजार होत असताना या संकटात माणूसकीचं दर्शनही पावलोपावली घडत आहे. जयपूरमधील एका आमदाराने आपली 40 लाख रुपयांची फॉर्च्यूनर गाडी एम्बुलन्स बनवून गरजूंसाठी दिलीय. 

गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली. मंगळवारी आमदार महोदयांना आपली 40 लाख रुपये किंमतीची कार रुग्णावाहिका म्हणून दिली. काही दिवसांपूर्वीच आमदार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये, गाव-खेड्यातील रुग्णांसाठी लवकर एम्बुलन्स उपलब्ध होत नसून रुग्णांची गैरसोय होत असल्याचं ते म्हणाले होते. तसेच, आरोग्य विभागाने परवानगी दिल्यास, मी माझी खासगी कार रुग्णांच्या सेवेसाठी देईल, असेही त्यांनी म्हटले होते.  मंगळवारी रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपली गाडी आरोग्य विभागाकडे दिली. तेव्हापासून रुग्णावाहिका म्हणून या गाडीचा उपयोगही सुरू झाला आहे. त्यानंतरही, आमदार लक्ष्मण सिंह यांनी व्हिडिओ शेअर करत, माझी फॉर्च्यूनर कार रुग्णांसाठी दिल्याचं म्हटलंय. तसेच, मतदारसंघातील नागरिकांनी सेवा करण्याची संधी दिली, माझेही कर्तव्य बनतेय की मी शक्य ती मदत करेन, असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय.  

टॅग्स :MLAआमदारcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटल