राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 08:01 IST2023-07-24T07:20:33+5:302023-07-24T08:01:17+5:30

लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं.

Former Rashtriya Swayamsevak Sangh Chief Minister Madan Das Devi passed away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

बंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवस संघाचे माजी सरकार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री मदन दास देवी यांचे बंगळुरूमध्ये आज पहाटे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थतेमुळे घरीच होते. तर, वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरीद्वार येथील पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर थेरपीद्वारे उपचारही करण्यात आले होते. दरम्यान, उद्या २५ जुलै रोजी सकाळी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं. तर जवळपास आयुष्यातील ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं. संघाकडून ते भाजपचे राजकीय निरीक्षक म्हणूनही कार्यरत होते. 

Web Title: Former Rashtriya Swayamsevak Sangh Chief Minister Madan Das Devi passed away