माजी प्राचार्य संदीप घोष यांना जामीन मंजूर, सीबीआय ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करू शकली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:40 IST2024-12-13T17:24:33+5:302024-12-13T17:40:45+5:30

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेत अटक करण्यात आलेले तळा पोलिस ठाण्याचे माजी प्रभारी अभिजीत मंडल यांना सियालदह येथील विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Former principal Sandeep Ghosh granted bail, CBI could not file chargesheet within 90 days | माजी प्राचार्य संदीप घोष यांना जामीन मंजूर, सीबीआय ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करू शकली नाही

माजी प्राचार्य संदीप घोष यांना जामीन मंजूर, सीबीआय ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करू शकली नाही

पश्चिम बंगालमधील सियालदह न्यायालयाने माजी तळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल आणि आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयला ९० दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र दाखल करता आलेले नाही, अशी माहिती दिली.

पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी माजी मुख्याध्यापकावर चौकशी सुरू आहे. याप्रकरणी माजी मुख्याध्यापकाची सखोल चौकशी करण्यात आली.

"हे निकाल आले नसते तर..."; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

संदीप घोष याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ९ ऑगस्ट रोजी आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी नागरी स्वयंसेवक संजय रॉय यांना अटक करण्यात आली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की, संदीप घोषने रुग्णालयाचे कंत्राट मिळवण्यासाठी दोन गटांना कथितपणे मदत केली होती. विशेष न्यायालयाने आरोपपत्र रेकॉर्डवर घेतले, परंतु पश्चिम बंगाल सरकारने संदीप घोष आणि इतर आरोपींवर खटला चालवण्यास मंजुरी न दिल्याने त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

१० ऑगस्ट रोजी सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृत आढळून आल्याने संदीप घोष यांना अटक करण्यात आली होती. ९-१० ऑगस्टच्या मध्यरात्री संजय रॉय या नागरी स्वयंसेवकाने डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी संदीप घोष यांचीही चौकशी सुरू होती.

Web Title: Former principal Sandeep Ghosh granted bail, CBI could not file chargesheet within 90 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस