शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee Death: ...जेव्हा वाजपेयींनी म्हटलं होतं, मी जिवंत आहे तो केवळ राजीव गांधींमुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:31 IST

राजीव गांधींच्या हत्येनंतर वाजपेयी खूप भावूक झाले होते

मुंबई: ही गोष्ट 1991 ची आहे. त्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झाली होती. अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. राजीव यांच्या हत्येनंतर वाजपेयी अतिशय भावूक झाले होते. त्यावेळी एका पत्रकाराशी बोलताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'आज मी जिवंत आहे, तो केवळ राजीव गांधींमुळे,' अशा शब्दांमध्ये वाजपेयींनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. वाजपेयी यांचं विधान राजीव गांधी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं होतं. वाजपेयींना 1991 च्या आधी किडनीचा त्रास होत होता. यावरील उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला जायचं होतं. मात्र आर्थिक कारणांमुळे त्यांना ते शक्य नव्हतं. त्यावेळी राजीव गांधी वाजपेयी यांच्या मदतीला धावून गेले होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर वाजपेयी यांनी याच घटनेची आठवण झाली आणि ते अतिशय भावूक झाले. राजीव गांधींना माझ्या आजारपणाची माहिती कुठून मिळाली माहित नाही. मात्र त्यांनी माझ्यासाठी मदतीचा हात पुढे केला, असं वाजपेयींनी एका पत्रकाराशी संवाद साधताना म्हटलं. 'मला उपचारासाठी परदेशात जाण्याची गरज आहे. मात्र आर्थिक कारणांमुळे मला ते शक्य नाही, हे राजीव गांधींना समजलं. यानंतर त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं. न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रात जात असलेल्या प्रतिनिधी मंडळात तुमचा समावेश करण्यात आला आहे, असं त्यावेळी मला राजीवजींनी सांगितलं. आता या संधीचा फायदा घेऊन तुम्ही उपचार करुन घ्या, असा सल्लादेखील राजीव यांनी मला दिला होता. मी आज जिवंत आहे, तो फक्त राजीव गांधींमुळे,' अशी आठवण त्यावेळी वाजपेयींनी एका पत्रकाराला सांगितली होती. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानAIIMS hospitalएम्स रुग्णालयBJPभाजपाDeathमृत्यू