शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Manmohan Singh: “ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत”; मनमोहन सिंगांच्या कन्येने BJP मंत्र्याला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 08:47 IST

Manmohan Singh: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांची तीव्र नाराजी ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीतकाँग्रेसने केला घटनेचा तीव्र निषेध

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेतेमंडळी एम्समध्ये जाऊन त्यांची भेट घेत आहेत. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, यावेळी मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते माझे आई-वडील आहेत. प्राणिसंग्रहालयातील दिखावू प्राणी नाहीत, या शब्दांत  नाराजी व्यक्त केली. 

झाले असे की, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी एम्स रुग्णालयात गेले होते. यावेळी एक फोटोग्राफर सोबत होता. मनमोहन सिंग यांच्या पत्नींनी या फोटोग्राफरला बाहेर जायला सांगितले. मात्र, त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मनमोहन सिंग यांचा एक फोटो घेतला. यावरून मनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत

माझे आई-वडील सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत. माझ्या आईने फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्याने ते ऐकले नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेही याबाबत काही बोलले नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत एम्सचे संचालयक डॉ. रणदीप गुलेरियाही होते. तरीही माझ्या आई-वडिलांना त्रास सहन करावा लागला. ते माझे आई-वडील आहेत, कोणत्याही प्राणिसंग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेले प्राणी नाहीत, या शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 

मांडवीय यांनी माफी मागावी

दमन सिंग यांनी काँग्रेसकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. पक्षाने यात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनसुख मांडवीय हे मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते की, फोटो काढण्यासाठी, असा खोचक सवाल करत काँग्रेसने या गोष्टीचा निषेध केला आहे. तसेच मांडवीय यांनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. 

दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधानमनमोहन सिंग यांची तब्येत अचानक बिघडली असून, त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना १९ एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना २९ एप्रिलला सोडण्यात आले होते. आता पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगAIIMS hospitalएम्स रुग्णालयcongressकाँग्रेस