शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:57 IST

Air India Plane Crash Reason: माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. विमान अपघाताच्या कारणाबद्दल केलेल्या व्हिडीओत त्यांनी शंका मांडल्या.  

Air India Plane Crash Update : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचेविमान पडले. विमानाचाअपघात का झाला, याबद्दल वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजाने यांनी अपघाताबद्दल दोन मुद्दे मांडले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गौरव तनेजा हे एअर एशियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ते कॅप्टन होते. नवीन व्हिडीओमध्ये गौरव तनेजांनी फ्लाईटरडार अॅपच्या ताज्या माहितीचा हवाला दिला आहे. हे अॅपच्या मदतीने लोक हवाई वाहतुकीबद्दल माहिती मिळवू शकतात. 

वाचा >>विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO

विमानाला टेकऑफ जास्त वेळ लागला

गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाचा धावपट्टीवरून जातानाचा व्हिडीओ दाखवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, विमान उड्डाण करताना धावपट्टीवर धूळ उडताना दिसत आहे. यातून असे दिसते की विमानाने पक्क्या धावपट्टीवरून नाही, तर कच्च्या किंवा धूळ असलेल्या धावपट्टीवरून उड्डाण केले. विमानाने धावपट्टी शेवटच्या टोकावरून टेकऑफ केले आणि ही बाब सामान्य मानली जात नाही.

ओव्हरलोडिंगमुळे विमान उड्डाण करू शकले नाही?

गौरव तनेजांनी म्हटले आहे की, या विमानाला जास्त वेळ धावपट्टीवरून जावं लागलं आणि टेकऑफ केल्यानंतर लगेच वेग कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विमानामध्ये काहीतरी गडबड होती. मग लोडिंगमध्ये काही अडचणी होत्या का? कारण असे अपघात यापूर्वीही झाले आहेत. १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच अपघात झाला होता, त्याचं कारण ओव्हरलोडिंग होतं.

जास्त नफा कमावण्यासाठी 

गौरव तनेजा म्हणाले की, 'अनेकदा विमान कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी विमानात जास्त सामान लादतात. सामान कागदोपत्री कमी दाखवले जाते, पण प्रत्यक्षात विमानात वजन जास्त असते. यावेळीही असेच काही झाले होते का? इस्रायलच्या तेल अवीवमध्ये सामानाचे वजन चुकीचे सांगितले गेले होते आणि अपघात झाला होता', असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमानahmedabadअहमदाबाद