माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:39 IST2025-04-29T14:38:25+5:302025-04-29T14:39:38+5:30
Former Pakistani MP Selling Kulfi In Haryana: या खासदाराची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
Former Pakistani MP Selling Kulfi In Haryana: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे व्हिसावर भारतात आलेले शेकडो/हजारो पाकिस्तानी आपल्या देशात परतले. पण, अजूनही बरेच भारतात बरेच पाकिस्तानी राहतात, ज्यांची परत तिकडे जाण्याची इच्छा नाही. अशाच लोकांमध्ये दबाया राम नावाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. दबाया राम यांची कहाणी अतिशय वेगळी आहे. दबाया राम एकेकाळी पाकिस्तानात खासदार होते, पण आजकाल ते भारतात कुल्फी विकून उदरनिर्वाह करत आहेत.
बेनझीर मुत्तो यांच्या सरकारमधील खासदार
पाकिस्तानचे माजी खासदार दबाया राम आता भारतातील हरियाणामध्ये कुल्फी आणि आईस्क्रीम विकून उदरनिर्वाह करत आहेत. पण, दबाया राम पाकिस्तानमधील बेनझीर भुट्टो यांच्या सरकारमध्ये खासदार होते. सन 2000 मध्ये आपल्या कुटुंबासह एका महिन्यांच्या व्हिसावर भारतात आले अन् तेव्हापासून भारतातच राहतात. गेल्या 25 वर्षांपासून ते भारतीय नागरिकत्व मिळण्याची वाट पाहत आहेत.
पाकिस्तान ते भारत...
डबाया राम सांगतात की, पाकिस्तानमध्ये हिंदूंची स्थिती खूप वाईट होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबासह भारतात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ते एका महिन्याच्या व्हिसावर भारतात आले होता. कालांतराने त्यांनी व्हिसा आधी एक वर्षासाठी आणि नंतर पाच वर्षांसाठी वाढवला. आता त्यांच्या कुटुंबात 34 सदस्य असून, त्यापैकी सहा जणांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, तर उर्वरित 28 जणांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.
पाकिस्तानमध्ये 25 एकर जमीन
डबाया राम यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांच्या नावावर अजूनही पाकिस्तानात 25 एकर जमीन आहे. त्यांची जमीन पाकिस्तानातील बकर जिल्ह्यातील दरियापूर तहसीलमधील पंचगिरेह भागात आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दबाया राम यांची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, दबाया राम आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी असे म्हटले.