शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
3
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
4
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
5
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
6
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
7
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
8
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
9
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
10
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
11
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
12
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
13
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
14
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
15
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
16
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
17
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
18
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
19
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
20
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:28 IST

नासिर आणि नौशाबा शहजाद पाकिस्तानात एक ट्रॅव्हल एजेन्सी चालवायचे. ते अशा लोकांना व्हिसा व्यवस्था करण्यात मदत करायचे जे त्यांना सहकार्य करतात.

नवी दिल्ली - पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या देशद्रोह्यांना भारतीय तपास यंत्रणांनी पकडले. या पाक हेरांची कसून चौकशी केली जात आहे त्यात एका मोठा खुलासा समोर आला. या संपूर्ण षडयंत्रात पाकिस्तानी पोलिसांचा माजी उपनिरीक्षक नासिर ढिल्ला नाव समोर आले आहे. तो सीमेपलीकडे गुप्तहेरांचे नेटवर्क चालवतो. ISI ने काही महिन्यापूर्वी नासिरची भरती केली होती. त्यानंतर नासिरने पोलीस नोकरी सोडली आणि Youtuber बनला. 

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ने नासिर आणि त्याचा सहकारी नौशाबा शहजाद यांना भारतीय इन्फ्लुएन्सरना त्यांच्या जाळ्यात ओढण्याचं काम सोपवले होते. नौशाबाला मॅडम एन नावानेही ओळखले जाते. हे दोघेही ISI आणि भारतीय युट्यूबर्स यांच्यात एक मध्यस्थ म्हणून काम करत होते. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनुसार, नासिर भारतीय युट्यूबर्सला पाकिस्तान आल्यानंतर उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी दानिश आणि इतरांना भेटवत होता. त्यानंतर दानिश त्यांना हेरगिरीचे काम सोपवायचा. दिल्लीतील पाकिस्तानी हाई कमिशनमध्येही अनेकांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते.

आणखी एका प्रकरणी नाव समोर आले

मे महिन्यात दानिशला भारताकडून काढण्यात आले. त्याआधी हरियाणा पोलिसांनी ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक केली होती. नासिरचं नाव जसबीर सिंगच्या चौकशीत समोर आले. जसबीर सिंग हादेखील एक युट्यूबर होता. त्याच्यावर भारतीय नौदलाच्या हालचालींची माहिती ISI ला देण्याचा आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रॉपर्टी डीलिंगचेही काम करतो नासिर

नासिर फैसलाबाद येथे प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करतो, त्याला SUV चालवण्याचा छंद आहे. नासिरचे युट्यूबवर अनेक फॉलोअर्स आहेत. तो कायम त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानातील त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी इच्छुक भारतीयांना पाकचा व्हिसा मिळवण्यासाठी मदत करायचा. परंतु हे काम त्याच्या हेरगिरीच्या नेटवर्कचा एक भाग होते. 

नासिर आणि नौशाबा शहजाद पाकिस्तानात एक ट्रॅव्हल एजेन्सी चालवायचे. ते अशा लोकांना व्हिसा व्यवस्था करण्यात मदत करायचे जे त्यांना सहकार्य करतात. व्हिसा आणि अन्य सुविधा जसे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, उत्तम सोय करून देत होते. हे दोघेही युट्यूबर्सना पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवणे आणि त्याला अपलोड करण्यास सांगायचे. असे करून ते पाकिस्तानची चांगली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातून ISI भारतीय इन्फ्लुएन्सरचा वापर करून भारताविरोधात चुकीची माहिती पसरवत होते. नासिर आणि नौशाबा शहजाद हे दोघे आयएसआयला मदत करत होते. भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी आयएसआयचा हा डाव ओळखून सतर्कता बाळगली आणि आवश्यक ते पाऊल उचलले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानYouTubeयु ट्यूबISIआयएसआय