शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुंबई हल्ल्याबद्दलच्या विधानाचा भारतीय माध्यमांकडून अर्थाचा अनर्थ - नवाज शरीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:02 AM

भारतीय माध्यमांनी माझ्या वक्तव्याची चुकीची व्याख्या केल्याचं नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

लाहोर- मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली होती. पण आता भारतीय माध्यमांनी माझ्या वक्तव्याची चुकीची व्याख्या केल्याचं नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे. रविवारी (ता. 14 मे) नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केलं. 'मुंबई हल्ल्याबद्दलच्या माझ्या वक्तव्याचा भारतीय मीडियाने चुकीचा अर्थ काढल्याचं', नवाज शरीफ यांनी म्हटलं. 

मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली होती. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचा पर्दाफाश केला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं. नवाज शरीफ यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाज शरीफ यांच्या वक्तव्याची भारतीय माध्यमांनी चुकीची व्याख्या केली. कुठल्याही तथ्याची पडताळणी न करता पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील एका वर्गाने या विधानाला पुष्टी दिली ज्यामुळे भारतीय माध्यमांना हा विषय वाढवण्यास बळ मिळालं. 

नेमकं प्रकरण काय?मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन 9 महिन्यांपूर्वी शरीफ पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले आहेत. 

पाकिस्तानी न्यायालयात मुंबई हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी अतिशय संथगतीनं सुरू आहे. त्यावरही शरीफ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'जेव्हा देशात दोन किंवा तीन समांतर सरकारं चालवली जात असतात, तेव्हा देशाचा गाडा हाकणं कठीण असतं. हे थांबायला हवं. देशात फक्त एकच सरकार असू शकतं, जे संविधानाच्या चौकटीत चालवलं जातं,' असं म्हणत शरीफ यांनी पाकिस्तान सरकारमधील हस्तक्षेपावर भाष्य केलं.  

कोणत्या कारणामुळे तुमचं पंतप्रधानपद गेलं, असा प्रश्न या मुलाखतीत नवाज शरीफ यांना विचारण्यात आला. मात्र त्यांनी या प्रश्नाचं थेट उत्तर देणं टाळलं. या प्रश्नाला उत्तर देताना शरीफ यांनी परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. 'आम्ही स्वत:ला वेगळं करुन घेतलं होतं. अनेकदा बलिदानं देऊनही कोणालाही आमचं म्हणणं पटत नव्हतं. अफगाणिस्तानची व्यथा सगळ्यांनी ऐकली. ती सर्वांना पटली. मात्र आमचं म्हणणं कोणीही मान्य केलं नाही. याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं,' असं शरीफ म्हणाले. 

यावेळी नवाज शरीफ यांनी दहशतवादी संघटनांवरही भाष्य केलं. 'दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. त्यांना सीमा ओलांडायची आणि मुंबईत जाऊन 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी द्यायला हवी का?,' असं शरीफ यांनी म्हटलं. 'रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात आम्ही मुंबई हल्ल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही ?,' असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. याआधी पाकिस्ताननं नेहमीच 2008 मधील मुंबई हल्ल्यात आपला कोणताही हात नसल्याचा दावा केला आहे.  

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफ26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान